छत्रपती संभाजीनगर

हिंगोली एकत्रित बातम्या

CD
फोटोसह ABD26J79680 सेनगाव ः तालुक्यातील पानकनेरगाव येथे नीलगायींच्या कळपाने केलेली पिकाची नासाडी. ------------ नीलगायींच्या कळपाकडून पिकांची नासाडी ----------- नुकसान होऊनही पंचनामा नाही; पानकनेरगावातील शेतकऱ्यांत संताप सेनगाव, ता. १८ (बातमीदार)ः तालुक्यातील पानकनेरगाव परिसरात नीलगायींच्या कळपाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रविवारी (ता.१३) रोजी ३० ते ३५ नीलगायींच्या कळपाने शेतात घुसून सोयाबीन व तूर पिकाची नासाडी केली. शेतकरी सुभाष काशीनाथ आकमार यांच्या गट क्रमांक ६४ मधील सुमारे २० ते ३० गुंठे क्षेत्रातील उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र, घटनेस काही दिवस उलटूनही वन विभागाकडून पाहणी अथवा पंचनामा करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. काढणीच्या तोंडावर आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पानकनेरगाव परिसरात नीलगायींचा उपद्रव वाढत असून वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सेनगाव यांना देऊन त्यांनी नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून पंचनामा करावा आणि नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नसल्याचे शेतकरी सुभाष आकमार यांनी सांगितले. ((कोट))) नीलगायींच्या कळपाने उभे पीक उद्ध्वस्त केले. वन विभागाला तातडीने माहिती देऊनही अद्याप पंचनामा झालेला नाही. भरपाई मिळणे दूर, साधी पाहणीही झालेली नाही. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा. -सुभाष काशीनाथ आकमार, शेतकरी, पानकनेरगाव -------------------- बुद्धिबळाच्या पटावर आलिजाची बाजी १४ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम; जिल्हा स्पर्धेसाठी निवड सेनगाव, ता. १८ (बातमीदार) : बुद्धिबळाच्या पटावर अचूक चालींची सांगड घालत सेनगावच्या आलिजा अमजदखान पठाण हिने दमदार कामगिरी नोंदवली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोलीतर्फे आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात आलिजाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आलिजा ही सेनगाव येथील मातोश्री लक्ष्मीबाई येवले प्राथमिक विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे. तालुकास्तरावरील या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल विद्यालयातर्फे आलिजाचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक व्ही.ए. येवले, एस.टी. मुटकुळे, व्ही.ए. कोकाटे, जे.टी. गिते, आर.बी. वाघमारे, व्ही.एस. जाधव, पी.एस. शिंदे, व्ही.आर. गुगळे, आर.डी. कोकाटे, पी.एन. मुटकुळे, पी.एन. कोळपे, यू.व्ही. घुगे, एल.वाय. घ्यार, बी.पी. बुळे, के.व्ही. धवसे, बी.एस. कोल्हाळ, सीमा कदम, जी.ए. कुलाल आदी उपस्थित होते. आलिजाच्या या यशाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी कौतुक करून तिचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्यासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. --------------- ABD26J79681 गिरगाव ः ग्रामपंचायत कार्यालयात भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित अभिवादन करण्यात आले. ------- भगवान विश्वकर्मा यांना जयंतीनिमित अभिवादन गिरगाव ः भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. गिरगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमास ग्रामपंचायत प्रशासक बी एन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी डी.के. आझादे, प्रमोद नादरे, ज्ञानेश्वर डोके, डिगांबर कऱ्हाळे, नामदेव पांचाळ, गणेश पांचाळ, वसंत सूर्यवंशी, माधव चाफेकानडे, मंगेश साखरे, मारोती उदगिरे, श्याम नादरे, गणेश पुंड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. ------------------------ गिरगावात ठिकठिकाणी ध्वजवंदन गिरगाव ः मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, बेगाजी पाटील विद्यालय, जिल्हा बँक, सेवा सोसायटी, जिल्हा परिषद शाळा, पशु वैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, हुतात्मा बहिर्जी विद्यालय आदी ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक बी. एन. कदम, ग्रामपंचायत अधिकारी डी.के. आझादे, चेअरमन सुनील पाटील नादरे, व्हाइस चेअरमन विठ्ठलराव कऱ्हाळे, माजी चेअरमन शंकरराव कऱ्हाळे, माजी जि.प. सदस्य विलास रायवाडे, विलास नादरे, प्रमोद नादरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बारसे, शाखाधिकारी बापूराव चौरे, मुख्याध्यापक सुरेश वगेवार, व्ही.एस. देशमुख, चेतन सातपुते यांच्यासह शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. ------------------------------ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उद्या करणार पीक पाहणी हिंगोली, ता . १८ (बातमीदार)ः जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात शनिवारी (ता.१९) रोजी पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे शनिवारी (ता.१९) रोजी जिल्ह्यातील पिक परिस्थितीची पाहणी करण्याकरीता येणार आहेत. दुपारी वसमत तालुक्यातील बोराळा तर दुपारी १ वाजता औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा येथे पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मंत्री भरणे हे वाशीमकडे रवाना होणार आहेत. ----------------- फोटो पावसाची जोरदार हजेरी. जवळा पांचाळ येथील खरिपातील पिकांना मिळाले जीवनदान. दीर्घ प्रतीक्षेनंतर हजेरी : सलग दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर परिसरात जोरदार पाऊस. अविनाश इंदुबाई लक्ष्मण उदगीरे जवळा पांचाळ १८(बातमीदार) कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ आणि परिसरात गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दीड महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून वाळण्याच्या मार्गावर असलेल्या खरिपाच्या पिकांना एकप्रकारे जीवनदान मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही पडला नसल्याने परिसरातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, केळी, हळद, तूर आणि ऊस यांसारखी पिके कोमेजून करपू लागली होती. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला होता. मात्र, १७ सप्टेंबरच्या रात्री अचानक ढगून येत धुवाधार पाऊस झाला. १)गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे पीक पार जळून जाण्याच्या वाटेवर होते. डोळ्यांदेखत मेहनत वाया जाते की काय अशी भीती वाटत होती. पण काल रात्री झालेल्या पावसामुळे पिकांना नवीन संजीवनी मिळाली आहे. — रामजी उदगीरे शेतकरी, जवळा पांचाळ २) हळद, ऊस आणि केळीच्या पिकांना या काळात पाण्याची प्रचंड गरज होती. पाऊस लांबल्यामुळे आम्ही चिंतेत होतो. या वेळेवर पडलेल्या पावसाने पिके पुन्हा हिरवीगार होऊन डोलू लागली आहेत, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. — गजानन जाधव शेतकरी, जवळा पांचाळ या पावसामुळे केवळ पिकांनाच दिलासा मिळाला नाही, तर विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखेरच्या टप्प्यात पडलेल्या या पावसाने बळिराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान आणि आनंदाचे हास्य फुलवले आहे. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT