shivsahi sakal
छत्रपती संभाजीनगर

पुणे मार्गावर धावल्या नऊ खासगी शिवशाही

पावणेदोन लाखाचे उत्पन्न : दोन ठिकाणी तिकीट बुकिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रशासनाने शुक्रवारपासून (ता. बारा) खासगी शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी उतरवली आहे. शनिवारी (ता. १३) मात्र नऊ शिवशाही बस पुणे मार्गावर चालवण्यात आल्या. शुक्रवारी दोन बस धावल्या होत्या. या दोन दिवसात एक लाख ७७ हजारांचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत पडले आहे. दरम्यान, शनिवारी १९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सहा दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकातून एकही बस आगाराच्या बाहेर पडली नाही. मात्र, शुक्रवारी पुणे मार्गावर दोन शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात आल्या होत्या. शनिवारी पुणे शहरासाठी नऊ शिवशाही बस चालवण्यात आल्या. या शिवशाहीची बुकिंगची व्यवस्था कर्णपुरा मैदान आणि वाळूज रोडवर करण्यात आली आहे. शनिवारी पुण्यासाठी रवाना करण्यात आलेल्या नऊही शिवशाही बस पूर्णक्षमतेने धावल्या. दरम्यान, जिल्हाभरातील आगारातील लालपरी मात्र अद्यापपर्यंत आगाराच्या बाहेर पडली नाही.

कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी प्रशासनाने निलंबनाचा बडगा उगारला आहे. मागील तीन दिवसांत तीस जणांना निलंबित केले होते. शुक्रवारी निलंबनाची कारवाई झाली नव्हती. मात्र, शनिवारी गंगापूर, सोयगाव आणि विभागीय मध्यवर्ती कार्यशाळेतील अशा एकूण १९ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

लातूरमध्ये निलंबन नाही

लातूर जिल्ह्यात शनिवारीही एसटी कामगारांचा संप सुरूच राहिला. महामंडळाने शनिवारी एकाही कामगारांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ कामगारांना निलंबित करण्यात आले असून, बसस्थानकातून खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी संपामुळे प्रवासी बसस्थानकाकडे फिरकताना दिसत नाहीत. यामुळे बसस्थानक ओसाड दिसत असून खासगी वाहने मात्र प्रवाशांच्या आशेने बसस्थानकात व भोवती घिरट्या घालताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT