Nitin Gadkari sakal
छत्रपती संभाजीनगर

Nitin Gadkari : शेतकरी बनणार ऊर्जा, इंधनदाता ;माजलगावमध्ये प्रचार सभा

देशातील शेतकरी ऊर्जा व इंधनदाता बनणार आहे. आपला देश आता इंधन आयात करणारा न राहता इंधन निर्यात करणारा ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : देशातील शेतकरी ऊर्जा व इंधनदाता बनणार आहे. आपला देश आता इंधन आयात करणारा न राहता इंधन निर्यात करणारा ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या बीड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रीतम मुंडे, सुजय विखे-पाटील, आमदार प्रकाश सोळंके, लक्ष्मण पवार तसेच बबनराव लोणीकर, रमेश आडसकर, मोहन जगताप, बाबूराव पोटभरे, जयसिंग सोळंके, नितीन नाईकनवरे, अशोक डक, अरुण राऊत आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘देशात गहू, मका, तांदूळ, साखर आदींचे अतिरिक्त उत्पादन होत होते. इथेनॉल निर्मितीमुळे उसाला चांगला भाव मिळणार आहे. आगामी काळात इथेनॉलचे पंप सुरू करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे साठ वर्षांत जी विकासाची कामे झाली नाहीत ती दहा वर्षांतच कितीतरी पटीने अधिक झाली आहेत. विकासात कृषी, उद्योग, व्यापार क्षेत्रांत मोठी प्रगती केली असून देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे’.

देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे’. संविधान कोणीही बदलू शकत नाही. आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व नितीन गडकरी यांनी घ्यावे, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

SCROLL FOR NEXT