NMMS Scholarship 398 student stay deprived due to laxity of schools application deadline today​ sakal
छत्रपती संभाजीनगर

NMMS Scholarship : एनएमएमएस योजनेपासून ३९८ विद्यार्थी राहणार वंचित

शाळांचा हलगर्जीपणा; अर्जासाठी फक्त आजची मुदत

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत यंदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. परंतु, जिल्ह्यात नव्याने उत्तीर्ण झालेल्या १३७, तर पुर्ननोंदणीच्या ३९८ मुलांचेच अर्ज भरणे बाकी असल्याने पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज न भरल्यास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मुख्याध्यापकांच्या वेतनातून वसूल करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (योजना) यांनी कळवले आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३१४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

मात्र, त्यातील केवळ १३७ मुलांचीच अर्ज पोर्टलवर भरण्यात आले आहेत. तसेच पुर्ननोंदणीमध्ये देखील ८४० पैकी ३९८ अर्ज भरण्याचे अद्याप बाकी आहे. अनेक शाळा या विद्यार्थ्यांचे एनपीएस पोर्टलवर अर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.

अर्ज भरण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत शेवटची मुदत असताना शाळांकडून अर्ज भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास योजनेची चार वर्षांची रक्कम म्हणजे ४८ हजार रुपये जबाबदार प्रत्येक मुख्याध्यापकांच्या पगारातून वसूल करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी अरुणा भूमकर (योजना) यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

प्रतिविद्यार्थी दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती

एनएमएमएस परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष १२ हजार रुपये या प्रमाणे चार वर्ष म्हणजे बारावीपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी एनपीएस पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी लागते. शाळेच्या लॉगइनवरूनच ही सुविधा असते.

नोंदणीत चुकारपणा केल्यास विद्यार्थ्याला मिळणारी चार वर्षांची शिष्यवृत्ती म्हणजे ४८ हजार रुपये मुख्याध्यापकांच्या पगारातून वसूल करून विद्यार्थ्यास देण्यात यावी, अशी देखील शासन निर्णयात तरतूद करण्यात आली आहे.

एनएमएमएस नूतनीकरणाचीही बोंबाबोंब

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत ८४० विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी केवळ ४५२ जणांचेच एनपीएस पोर्टलवर नूतनीकरण असून ३९८ विद्यार्थ्याचे नूतनीकरण बाकी आहे. त्यामुळे या शिष्यवृत्तीपासून ५० टक्के विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.

नवीन व विद्यमान शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास वारंवार लेखी व तोंडी सूचना देवूनही अर्ज प्रलंबित आहेत. तेव्हा शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील. याची मुख्याध्यापकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

— अरुणा भूमकर, शिक्षणाधिकारी, योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT