NIkhil Gupta Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत जमावबंदी नाही : निखिल गुप्ता

राज ठाकरेंची सभा रद्द करण्यासाठी निवेदन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, असे वृत्त माध्यमांत आले होते. मात्र, शहर व परिसरात कोणत्याही प्रकारची जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही. असे वृत्त प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे. औरंगाबादेत कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार पाचहून अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून असे करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, महाराष्ट्र पोलिस कायदा ३५ अन्वये आदेश जारी केलेला आहे. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले की, असा आदेश आम्ही वर्षभर काढत असतो. सण-उत्सवांदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, तसेच विविध मिरवणुकींसाठी या आदेशानुसार आम्ही मार्ग सुचवत असतो. ही नियमित चालणारी प्रक्रिया असते. या आदेशाचा अर्थ जमावबंदी लागू केली, असा होत नाही. तसेच या आदेशाला १ मेरोजी होणाऱ्या सभेशी जोडले जात आहे, हे चुकीचे आहे, असेदेखील त्यांनी नमूद केले.

राज ठाकरेंची सभा रद्दसाठी निवेदन

औरंगाबाद - मनसेच्या १ मे रोजी नियोजित सभेला परवानगी देऊ नये, ही सभा रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन दिले. शहरात ता. १ आणि २ मे रोजी मीना बाजार तसेच रमजान खरेदीसाठी गर्दी राहील. राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक ही सभा १ मेरोजी ठेवल्याचा आरोप करण्यात आला. राज ठाकरे यांच्या सभेमुळे दोन समाजात तणाव निर्माण होऊन शांतता भंग होऊ शकते. मुंबई येथून सुद्धा मनसेचे कार्यकर्ते औरंगाबादेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेला परवानगी नाकारावी, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT