Aurangabad News Non-teaching staff also need vacation as professor 
छत्रपती संभाजीनगर

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हवी प्राध्यापकांप्रमाणे सुट्टी

अतुल पाटील

औरंगाबाद : कोरोना विषाणूबाबत खबरदारी म्हणून प्राध्यापकांना २६ मार्चपर्यंत घरून काम करण्याची मुभा दिली आहे. त्याप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघातर्फे कुलगुरुंना करण्यात आली आहे. विद्यापीठात ७७७ शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत.

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघातर्फे मंगळवारी (ता.१७) निवेदन देण्यात आले. निवेदनात म्‍हटले कि, कोरोना विषाणूची साथ पसरू नये, संसर्ग होऊ नये, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या १६ मार्च रोजीचे पत्र आणि त्याअनुषंगाने विद्यापीठाने निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना सुट्टी जाहीर केली आहे. संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सदरील सुट्टी देण्यात आलेली नाही.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होणार नाही का? शिक्षकांना वेगळा न्याय आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय? असा भेदभाव करणे योग्य नाही. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर, त्यास कोण जबाबदार? त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षकांप्रमाणे सुट्टी जाहीर करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष कैलास पाथ्रीकर, सेवक संघाचे अध्यक्ष पर्वत कासुरे, सचिव प्रकाश आकडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

परिपत्रकात असं म्हटलय...
विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले कि, विद्यापीठाचे इतर सर्व अधिकारी  व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियमितरित्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. तर, राज्य शासनाने काढलेल्या पत्रात, कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव, उपकुलसचिव तसेच महाविद्यालय, तंत्रनिकेतनचे प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियमितरित्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. अशा सूचना उपसचिव सतिश तिडके यांनी दिल्या आहेत.


राज्य शासनाने पाठवलेल्या परिपत्रकानुसार आम्ही अंमलबजावणी करत आहोत. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबाबत आदेश आल्यास तसे कळवू.
-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT