indurikar maharaj indurikar maharaj
छत्रपती संभाजीनगर

इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त विधान केल्याप्रकरणात खंडपीठाने बजावली नोटीस

या रद्दच्या आदेशाला अंनिसकडून आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे

सुषेन जाधव

औरंगाबाद: प्रसिद्ध मराठी किर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी कीर्तनातून पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा दावा करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर संगमनेर (जि. नगर) दिवाणी न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने पीसीपीएनडी कायद्यानुसार (pcpndt act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेर न्यायालयाने या प्रकरणात इंदोरीकर यांना दिलासा देत खटला रद्द केला होता.

या रद्दच्या आदेशाला अंनिसकडून आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील यांनी इंदोरीकर यांना नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात इंदोरीकर महाराज यांनी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत खटला रद्द करण्याची विनंती केली होती. सुनावणीअंती संगमनेर न्यायालयाने खटला रद्द केला होता. या रद्दच्या आदेशाला अंनिसच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणी खंडपीठाने इंदोरीकर महाराज यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी २९ जून २०२१ रोजी होणार आहे. या प्रकरणात ॲड. गवांदे यांच्यासह ॲड. नेहा कांबळे, ॲड. जितेंद्र पाटील काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT