Imran Mehndi sakal
छत्रपती संभाजीनगर

Imran Mehndi : कुख्यात गुंड इम्रान मेहंदी घाटीत दाखल

हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड इम्रान मेहंदी दिलावर नसीर (वय ४९) याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड इम्रान मेहंदी दिलावर नसीर (वय ४९) याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेहंदीला डोळ्याचा त्रास असून, त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेहंदी रुग्णालयात आल्याचे समजताच यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

मेहंदीला काही दिवसांपासून डोळ्याने दिसण्यास त्रास होत असल्याने त्याला मंगळवारी (ता. १८) घाटी रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले. यात त्याला मोतीबिंदू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील एका वॉर्डात त्याला दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी (ता.१९) त्याच्या तपासण्या करून त्यात फिट आढळल्यास शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मेहंदी रुग्णालयात आल्याचे समजताच घाटीतील आरएमओ, अधिकाऱ्यांचे फोन खणखणायला लागले. कोण दाखल झाले आहे. कशासाठी कॉल येत आहेत, हे त्यांनाही कळेनासे झाल्याचे पाहायला मिळाले.

विभागप्रमुख थेट अधिष्ठातांकडे

मेंहदी दाखल झाल्यानंतर, नेत्ररोग विभागाच्या विभागप्रमुख डॉ.अर्चना वरे या दीडच्या सुमारास थेट अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे गेल्या. त्यांना ‘व्हीव्हीआयपी’ रुग्ण असल्याचे सांगितले. यासंबंधी वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात असलेल्या एका पत्रात याप्रकरणी सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असणार असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

SCROLL FOR NEXT