sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : आता थेट प्राध्यापकांच्या खात्यात मानधन ; प्राचार्यांकडून खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे पैसे लाटल्याचे होते आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांतील परीक्षांसंदर्भातील मानधनाची रक्कम प्राचार्यांकडून संबंधित प्राध्यापकांना दिली जात नव्हती. अनेकदा प्राचार्यांकडून खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे पैसे मिळविले जात असल्याचे एक ना अनेक आरोप विद्यापीठाच्या अधिसभेत करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांतील परीक्षांसंदर्भातील मानधनाची रक्कम प्राचार्यांकडून संबंधित प्राध्यापकांना दिली जात नव्हती. अनेकदा प्राचार्यांकडून खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे पैसे मिळविले जात असल्याचे एक ना अनेक आरोप विद्यापीठाच्या अधिसभेत करण्यात आले होते.

यासंदर्भात ‘सकाळ’ने दोन डिसेंबरच्या अंकात ‘प्राचार्यांवर धडाडल्या आरोपांच्या फैरी’ या मथळ्याखाली प्राचार्यांचा समाचार घेतला होता. त्याची दखल घेत अखेर विद्यापीठ प्रशासनाने सदर मानधन थेट संबंधित प्राध्यपकांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील ऑनलाईन यंत्रणेचे सॉफ्टवेअरही तयार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यापासून उत्तरपत्रिका तपासण्यापर्यंत परीक्षकांसह संबंधितांचा होणारा खर्च विद्यापीठाकडून प्राचार्यांच्या नावाने दिला जात होता. त्यातून अनेकदा प्राचार्य खर्चापोटीचे हे मानधन संबंधितांना देत नसत. चार जिल्ह्यातील चारशेहून अधिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांमधून बोटावर मोजण्याइतपत प्राचार्यांचा अपवाद वगळता लाखोंची ‘माया’ काही प्राचार्यांकडून जमविल्याचा आरोपही अधिसभेत करण्यात आला होता.

तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यकाळातील शेवटची आणि दहावी अधिसभा त्यांनी चांगलीच गांभीर्याने घेतली होती. दरम्यान दोषी आढळणाऱ्या प्राचार्यांविरोधात गुन्हेही दाखल करण्याची भूमिका घेतली होती. अखेर तो मुद्दा मार्गी लागला असून परीक्षेसंदर्भातील मानधन संबंधित प्राध्यापक मंडळींच्या खात्यात जमा होणार असल्याचे पत्र परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जारी केले आहे.

पत्रानुसार विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या लेखी परीक्षेत कार्यरत असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मानधन ऑनलाईन संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे. त्यासाठी विहित अर्जाच्या दोन प्रती परीक्षा संपल्यानंतर एक महिन्याच्या आत जमा करावे लागणार असून त्यानंतर हे मानधन जमा केले जाणार आहे.

मात्र, या पत्रात संबंधितांनी हा अर्ज प्रत्यक्ष सादर करावा की, पोस्टाने पोच करावा याबाबत स्पष्टता नसल्याने मानधनापोटी मिळणारी रक्कम इतर जिल्ह्यातून विद्यापीठात येण्याजाण्यासाठीच खर्च होईल, अशी शंका संबंधितांनी व्यक्त केली, याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT