छत्रपती संभाजीनगर

छोट्या व्यापाऱ्यांसाठी क्यूआर, साऊंडबॉक्सला प्रोत्साहन

CD
छोट्या व्यापाऱ्यांसाठी क्यूआर, साउंड बॉक्सला प्रोत्साहन ------ एनपीसीआयची तीन वर्षांसाठी ‘यूपीआय व्यापार सक्षम योजना’ --- छत्रपती संभाजीनगर, ता. १४ : छोटे दुकानदार, फेरीवाले आणि ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंटशी जोडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमने (एनपीसीआय) ‘यूपीआय व्यापार सक्षम योजना’ जाहीर केली आहे. याअंतर्गत पात्र नवीन व्यापाऱ्यांकडे प्रत्यक्ष क्यूआर कोड बसविणाऱ्या अधिग्रहण बँकेला ३०० रुपये, तर साउंड बॉक्स बसविल्यास ७५० रुपये प्रोत्साहन मिळणार आहे. ११ नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार, मागील आर्थिक वर्षात ४० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेले व्यापारी पात्र असतील. टियर-३ ते टियर-६ शहरे, ईशान्येकडील राज्ये, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील व्यापाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. टियर-१ आणि टियर-२ शहरांतील पीएम स्वनिधी व पीएम विश्वकर्मा योजनेच्या पात्र लाभार्थींचाही समावेश आहे. प्रोत्साहनासाठी व्यापाऱ्याने तिमाहीतील किमान दोन महिन्यांत प्रत्येकी २५ पात्र यूपीआय व्यवहार करणे आणि प्रत्येक महिन्यात किमान पाच हजार रुपयांची व्यवहार रक्कम असणे आवश्यक आहे. केवळ उपकरण बसविल्याने प्रोत्साहन मिळणार नाही. योजनेतील ५० टक्के निधी विद्यमान व्यापाऱ्यांचे व्यवहार वाढविण्यासाठी, तर २० टक्के निधी लक्ष्यित क्षेत्रांतील अतिरिक्त व्यवहारवाढीसाठी राखीव आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत पात्र व्यवहारसंख्येत किमान पाच टक्के वाढ साधणाऱ्या पात्र बँकांना व्यवहारांच्या एकूण रकमेवर ०.०३ टक्के प्रोत्साहन मिळेल. लक्ष्यित क्षेत्रांसाठी ५० टक्के अतिरिक्त प्रोत्साहन, तर अतिरिक्त व्यवहारमूल्यवाढीवर ०.२० टक्के प्रोत्साहन दिले जाईल. --------- वर्षाला एक कोटी क्यूआर कोडचे उद्दिष्ट दरवर्षी ६० लाख ते एक कोटी नवीन क्यूआर कोड आणि पाच ते दहा लाख साउंड बॉक्स बसविण्याचे उद्दिष्ट आहे. विद्यमान छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवहारांत ३० ते ५० टक्के वार्षिक वाढ साधण्याचेही नियोजन आहे. दोन हजार रुपयांपर्यंतचे यशस्वी व्यापारी यूपीआय व्यवहारच प्रोत्साहनासाठी पात्र असतील. मोठ्या व्यवहारांचे कृत्रिम विभाजन, रद्द झालेले आणि परतावा दिलेले व्यवहार अपात्र ठरतील. योजनेचा निधी सहभागी बँका आणि पेमेंट सेवा पुरवठादारांच्या एमडीआर उत्पन्नातील पाच टक्के योगदानातून उभारला जाणार आहे. नवीन व्यापारी नोंदणी, व्यवहारवाढ आणि लक्ष्यित क्षेत्रांतील अतिरिक्त वाढ यांसाठी अनुक्रमे ३०, ५० आणि २० टक्के निधी राखीव आहे. एमडीआर लागू झाल्यापासून पुढील तीन वर्षे ही योजना कार्यान्वित राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! लोणार सरोवराला 'जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा' दर्जा; ठरलं भारतातील दुसरं ठिकाण

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

SCROLL FOR NEXT