छत्रपती संभाजीनगर

अंड्यांबाबतचे गैरसमज दूर

CD
अंड्यांच्या पोषणमूल्याबाबत जनजागृती परभणी, ता. १३ : जागतिक अंडी दिनानिमित्त पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी अंडी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंड्यांविषयीचे गैरसमज दूर करून त्यांचे पोषणमूल्य आणि दैनंदिन आहारातील महत्त्व पटवून देण्यावर यावेळी भर देण्यात आला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वास साळुंके, डॉ. प्रकाश केकान आणि डॉ. धनंजय देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. काकासाहेब खोसे यांनी अंड्यांविषयी समाजात प्रचलित असलेले गैरसमज दूर करून त्यांच्या पोषणमुल्याची माहिती दिली. नोडल अधिकारी डॉ. म्हाळसाकांत निकम यांनी दैनंदिन आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे महत्त्व विशद केले. अंड्यांमधील पोषक घटक शरीराची वाढ आणि उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. साळुंके यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दहा जणांपर्यंत अंड्यांच्या पोषणमूल्याची माहिती पोचवावी, असे आवाहन केले. कार्यक्रमात प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शेवटी उपस्थितांना उकडलेल्या अंड्यांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. हनुमंत मानेमोड यांनी, तर आभार डॉ. तेजस पिसाळ यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

पुणे विद्यापाठीत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, विद्यार्थींनींनी मध्यरात्री पोलीस स्टेशन गाठलं, काय घडलं?

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! ४० मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पार, मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट प्रकल्प वेगात; कधी होणार पूर्ण?

SCROLL FOR NEXT