sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Obc Morcha : कन्नड तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाचा मोर्चा ; आरक्षणातील हस्तक्षेपास विरोध ,आक्षेप नोंदीसाठी कक्ष २४ तास सुरु ठेवा

कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबिसींमध्ये मराठा समाजाचा समावेश होत असल्यामुळे यावर तीव्र आक्षेप घेत, कन्नड तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने, गुरुवारी (ता.१) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबिसींमध्ये मराठा समाजाचा समावेश होत असल्यामुळे यावर तीव्र आक्षेप घेत, कन्नड तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने, गुरुवारी (ता.१) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी नागरिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात नमुद करण्यात आले की, सगे सोयरे या शब्दाची कायदेशीर व्याख्या कुठेही नाही.

सगे सोयरे हे स्वजातीय बरोबरच इतर जातीय, इतर धर्मीय सुद्धा असू शकतात. असा ढोबळ शब्द जर कायद्यामध्ये, नियमावलीमध्ये राहिला तर त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जाणार आहे. सुधारित नियमावली असंवैधानिक व घटनाबाह्य असूनही मसुदा तत्काळ रद्द करण्याची मागणी मोर्चेकर्यांनी केली तसेच ओबीसी समाजाला आक्षेप नोंदविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा, अशीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

मागण्या मान्य न झाल्यास, न्यायालयात दाद मागितली जाईल असाही इशारा देण्यात आला. याप्रसंगी मोर्चात प्रा. विलास दाबके, जगदीश जाधव, साईनाथ करवंदे, प्रकाश शिरसे, संजय मुगले, किशोर सोनवणे, वाल्मीक शिरसे, नितीन भांडवलदार, बाबूराव गाधव साहेबराव गवळी, अर्जुन जाधव, किशोर गवळी, सुरेंद्र क्षीरसागर, नवनाथ शहाणे, योगेश जाधव, स्वप्नील जाधव, नंदू शिरसे, वैभव शिरसे, वैभव दाबके, राहुल दापके, विलास जाधव, प्रा.नेवगे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात हादरवून टाकणारी घटना! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतलं फेविक्विक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Government Decision: सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयातील धावपळ संपणार, ५ प्रमुख नियमांत बदल; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

पाकिस्तानचा अजब कारभार ! एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही, FC मध्ये ३३.१० ची सरासरी... अशा खेळाडूला बनवलं बॅटींग कोच... कोण आहे तो?

Marathi Live Updates News: नागपूरमध्ये जुन्या वादातून सशस्त्र हल्ला

मी त्यांची वाईट बाजू पहिलीये... नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडियांचं सडेतोड वक्तव्य; म्हणाल्या, 'तो माणूस खूप...'

SCROLL FOR NEXT