छत्रपती संभाजीनगर

आक्टोबर हिट : नागरिक हैराण

CD
उरलेली पिके ऑक्टोबर हीटच्या तडाख्यात जळकोट, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढला असून ऑक्टोबरच्या सुरवातीलाच वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे. ऐन दुपारी कडक उन्हामुळे एप्रिल-मे महिन्याचा अनुभव येत असून, ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण झाले आहेत. शेतमजूर, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शहरासह ग्रामीण भागात दिवसभर कडक ऊन पडत आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाचा त्रास होत असून, शिवारातील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने पिकांवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. यंदा सोयाबीन हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त तूर आणि कापूस पिकांवर होती. मात्र, पावसाअभावी आणि वाढत्या तापमानामुळे तुरीचे पीकही अडचणीत आले आहे. कापसाची बोंडे गळून पडत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उसासह अन्य पिकांनाही वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. पावसाचा खंड, जमिनीतील कमी झालेला ओलावा आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे पिकांवरील उष्णतेचा ताण वाढला आहे. एकीकडे पावसाने दगा दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे उरलेल्या पिकांवरही संकट ओढवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT