छत्रपती संभाजीनगर

Crime : सावधान! ‘या’ म्हाताऱ्याचा आहे फसवणुकीचा धंदा! एकच जमीन तिघांना विकून 17 लाख उकळले

या म्हाताऱ्याविरोधात २०११ आणि २०१५ साली फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : एकानंतर एक अशा तिघाजणांना एकच जागा विक्री करून तब्बल १७ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२३ दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्याविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष दत्तु पाटील (वय ६५, रा. एन-७, सी २ सिडको) असे त्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी मुकुंद श्रीरंगराव जगदाळे (वय ५१, रा. प्रोझोन मॉलशेजारी, एमआयडीसी चिकलठाणा) यांच्या फिर्यादीनुसार, सुभाष आणि फिर्यादी ओळखीचे आहेत. दोघांमध्ये सुभाषच्या मोरहिरा येथील गट २६ मधील ७० आर (गुंठे) जमीन विक्रीचा पाच लाख ४० हजार रुपयांमध्ये व्यवहार झाला. दरम्यान सुभाषने २०२० मध्ये सहदुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताद्वारे फिर्यादीला जमीन विक्री केली होती. दोघांच्या साक्ष, स्वाक्षऱ्यानंतर सर्व प्रक्रिया करुन फिर्यादीला जमिनीचा ताबा देण्यात आला होता.

पैसे येतील तसे विकतच गेला

आरोपी सुभाषने जमीन फिर्यादीच्या ताब्यात दिली खरी, मात्र सदर जमिनीचा फेर घेणे बाकी होते. सुभाष याने नेमका याचाच फायदा घेत मुकुंद यांना विक्री केलेली जमीन त्यांना माहिती होऊ न देता १२ ऑगस्ट २०२२ रोजी शिवाजी औताडे (रा. हर्सूल) यांना सहा लाख रुपयांत दुय्यम निबंधक कार्यालय तीन येथे खरेदीखत करून देत विक्री केली.

इतकेच नव्हे तर औताडे यांना विक्री केलेली मुकुंद यांची जमीन पुन्हा प्रकाश सुखदेव पाटील (रा. राठी संसार, पिसादेवी रस्ता) यांना १२ जानेवारी २०२३ रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय पाच येथे खरेदी खताद्वारे सहा लाख रुपयांमध्ये विक्री केली. विशेष म्हणजे आरोपीने तिन्ही वेळा जमीन विक्रीचे खरेदी खत करताना सहनिबंधक कार्यालये बदलली आणि पैसा येतील तशी जमीन विकत राहिला.

इतकेच नव्हे तर आरोपी सुभाष पाटीलविरोधात २०११ आणि २०१५ साली फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक उद्धव हाके हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT