छत्रपती संभाजीनगर

चार पॅसेंजर गाड्यांचे जुने डबे गुरुवारपासून हद्दपार

CD
चार पॅसेंजर रेल्वेंचे जुने डबे गुरुवारपासून हद्दपार -- छत्रपती संभाजीनगर, ता. १६ : दक्षिण मध्य रेल्वेच्या चार पॅसेंजर रेल्वेंचे जुनाट डबे आता हद्दपार होणार आहेत. त्याऐवजी आता सेकंड क्लास चेअर कार प्रकारचे डबे जोडण्यात येणार आहेत. हा बदल १९ नोव्हेंबरपासून अमलात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे की, सध्या पॅसेंजर रेल्वेंना जुन्या आयआरएस (इंडियन रेल्वे स्टँडर्ड) प्रकारचे डबे वापरले जातात. या डब्यांची रचना आणि तंत्रज्ञान कालबाह्य झाले असून, त्याऐवजी आधुनिक सीबीसी (सेंटर बफर कप्लर) प्रकारचे डबे वापरले जातात. सीबीसी ही यंत्रणा लगतच्या डब्याला खेचणे आणि ढकलणे अशा दोन्ही क्रिया करू शकते. तसेच, या यंत्रणेमुळे रेल्वेला अधिकाधिक डबे जोडता येतात. दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-मनमाड, पूर्णा-आदिलाबाद, परळी वैजनाथ-अकोला आणि पूर्णा-परळी वैजनाथ या चार पॅसेंजरचे डबे बदलण्याचा निर्णय घेतला. या सर्व पॅसेंजर एकूण १६ डब्यांच्या राहणार असून, त्यात १४ सेकंड क्लास चेअर कार प्रकारचे आणि दोन एसएलआर प्रकारचे डबे असतील. नांदेड-मनमाड पॅसेंजरला १९ तारखेपासून, पूर्णा-आदिलाबाद पॅसेंजरला २० तारखेपासून, परळी वैजनाथ-अकोला पॅसेंजरला २१ तारखेपासून; तर पूर्णा-परळी वैजनाथ पॅसेंजरला २२ तारखेपासून नव्या डब्यांचा वापर करण्यास सुरवात केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti news : सोलापुरात ऊस दरावरून रणकंदन; राजू शेट्टी आक्रमक

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : सोलापूरनंतर आता 'स्वाभिमानी'चा मोर्चा बारामतीकडे; ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी कारखान्यांना २५ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

SCROLL FOR NEXT