latur sakal
छत्रपती संभाजीनगर

Latur News : बुद्धिबळ स्पर्धेत ओंकार पाटील विजेता

निलंगाच्या वैभव नरेवाडला उपविजेतेपद, आदित्यराज तृतीय

सकाळ डिजिटल टीम

लातूर : येथील चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात पहिल्या राज्यस्तरीय फार्मा बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या भारती विद्यापीठाच्या ओंकार पाटील याने पटकाविले. स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक निलंगाच्या वैभव नरेवाड तर तृतीय पारितोषिक धाराशिवच्या आदित्यराज ढवळे याने मिळविले.

स्पर्धेचे उद्‌घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव अॅड. बळवंत जाधव यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ विधिज्ञ ब्याळे अध्यक्षस्थानी होते. पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टचे सचिव भीमाशंकर देवणीकर, संचालक विजयकुमार मठपती, चन्नबसवेश्वर फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी आणि चन्नबसवेश्वर पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय थोंटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी अॅड. जाधव यांनी बुद्धिबळ हा खेळ सर्वांच्या विचारांना चालना देणारा असून या खेळामुळे सर्वांगीण विकास, चिकित्सक वृत्ती , एकाग्रता, दूरदृष्टीपणा व चौकस बुद्धिमत्ता वाढत असल्याचे सांगितले.स्पर्धेतील विजेत्यांचा रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

चौथे पारितोषिक शिवम कुलकर्णी, पाचवे यासिन शेख तर सहावे पारितोषिक चैतन्य इंगळे यांनी पटकावले. स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध फार्मसी महाविद्यालयातील दीडशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेसाठी पंच म्हणून श्रीराम साने, श्रीकांत मंत्री, संदीप सूर्यवंशी आणि विजयकुमार उपासे यांनी काम पहिले.

स्पर्धेसाठी डॉ. नशीर शेख, प्रा. मोईन अत्तार, प्रा. शिवकुमार लद्दे, प्रा. अविनाश मठपती, प्रा. अमोल नरगुडे, प्रा. भीमाशंकर हुच्चे, प्रा. रोहित कोंबडे, प्रा. प्रशांत बनसोडे, प्रा. वसिम काझी, प्रा. प्रगती वट्टमवार, प्रा. दीक्षा विभुते, प्रा. अंजली तनपु यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. प्रा. जयश्री स्वामी, प्रा. निकिता जट्टे व ऋतुजा लंकाळे यांनी सूत्रसंचालनकेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT