करमाड : पोलिस पथकाने जप्त केलेल्या आयशरसह गुटख्याने भरलेल्या गोण्या तसेच खाली बसलेला आरोपी. SAKAL
छत्रपती संभाजीनगर

करमाडजवळ एक कोटीचा गुटखा जप्त

औरंगाबाद-जालना मार्गावरील गोलटगाव फाट्यावर पोलिसांची कारवाई, चालक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

करमाड : औरंगाबाद पोलिस अधीक्षकांचे पथक व करमाड पोलिसांनी रविवारी (ता.५) दुपारी पाठलाग करून औरंगाबाद-जालना मार्गावरील गोलटगाव फाट्यावर टेंपो (आयशर) अडविला. त्यातून सुमारे एक कोटीचा गुटखा जप्त केला. टेंपोचालकाला ताब्यात घेतले.या कारवाईत पोलिसांनी ८३ गोण्यांतील सुमारे एक कोटी पंचवीस हजार रुपयांचा नजर नावाचा गुटखा, पंधरा लाख रुपये किमतीचे आयशर (एमएच-०४, जेके-३६१५) व आयशरचालकास ताब्यात घेतले आहे.

अमरावतीहून औरंगाबाद मार्गे मुंबईकडे टेंपोतून गुटखा नेला जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर यांना सकाळी मिळाली. करमाडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना कळवून भवर यांनी तेथे धाव घेतली.बोकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जालना मार्गावरील शेकटा फाट्यावर सापळा लावला. दुपारी दीडच्या सुमारास संबंधित टेंपो करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आला. पथकाने पाठलाग करून गोलटगाव फाट्यावर टेंपो घेरला. तपासणी केली असता टेंपोत नजर नावाचा गुटख्याच्या मोठमोठ्या ८३ गोण्या आढळल्या. गुटख्याची किंमत सुमारे एक कोटी पंचवीस हजार रुपये आहे. चालकासह टेंपो ताब्यात घेऊन करमाड पोलिस ठाण्यात आणला. टेंपोसह एक कोटी १५ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक भवर, पोलिस निरीक्षक बोकडे, सहायक निरीक्षक प्रशांत पाटील, उपनिरीक्षक राजू नागलोत आदींसह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागातर्फे फिर्याद येणे अपेक्षित आहे. तथापि, रविवार असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही, असे करमाड पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT