sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar News : रस्त्यांसाठी हवेत एक हजार कोटी

शहराच्या विकास आराखड्यातील शेकडो रस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विकास आराखड्यातील शेकडो रस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे महापालिकेने यातील प्रमुख रस्त्यांची यादी तयार केली असून, हे रस्ते करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सुमारे १५० रस्त्यांसाठी एक हजार कोटी रुपये मिळावेत, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्याची अनेक वर्षांपासून अंमलबजावणी झालेली नाही. शहर परिसरातील अनेक रस्त्यांचे अद्याप मार्किंगही झालेले नाही. त्यामुळे खडीकरण, डांबरीकरणाचा प्रश्‍नच येत नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक डीपी रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत तर काही ठिकाणी भूखंड माफियांनी प्लॉट टाकून सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे.

डीपी रस्त्यांचे मार्किंग करून त्याठिकाणी फलक लावण्याच्या सूचना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केल्या, पण त्याचाही अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान राज्य शासन डीपी रस्त्यांच्या बळकटीकरणासाठी विविध शहरांना निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शहर परिसराला प्राधान्य

शहर अभियंता विभागाने शहरातील सुमारे दीडशे रस्त्यांची यादी तयार केली असून, या रस्त्यांसाठी एक हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. यात चिकलठाणा, पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडीसह इतर भागात अनेक ठिकाणी थोड्याथोड्या जागांमुळे अडकून पडलेले रस्ते, ज्या भागात नागरिकीकरण झाले आहे, अशा भागांतील रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

  • भूसंपादनासाठीही खर्च

  • विकास आराखड्यातील

  • रस्त्यांचे अद्याप भूसंपादनही

  • झालेले नाही. भूसंपादनासाठी मात्र महापालिकेला खर्च करावा

  • लागणार आहे. रस्त्यांचे

  • मजबुतीकरण करून सिमेंट

  • क्रॉँक्रिटीकरण किंवा

  • डांबरीकरणासाठी राज्य शासनाकडून

  • निधी मिळू शकतो, अशी महापालिकेला अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT