छत्रपती संभाजीनगर

उमरगा तालुक्यात ३७

CD
३७ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ ग्रामस्थांच्या एकोप्याला बळ; उमरगा, मुरूम पोलिस ठाणे हद्दीतील गावांचा सहभाग ----- उमरगा, ता. २० (बातमीदार) : ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे उमरगा तालुक्यातील ३७ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ७४ गावांपैकी ३०, तर मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सात गावांत एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या गणेशोत्सवाला उमरगा तालुक्यात दरवर्षी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या १६ ते १७ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’चा उपक्रम राबविला जात असून, उमरगा तालुक्यातही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ----- या गावांत एक गणपती मानेगोपाळ, सावळसुर, चिरेवाडी, भगतवाडी, मातोळा, एकुरगावाडी, हंद्राळ, मळगीवाडी, जवळगा बेट, भिकारसांगवी, बाबळसुर, कराळी, जकेकुरवाडी, थोरलीवाडी, चंडकाळ, कदमापूर, दुधनाळ, कुन्हाळी, व्हंताळ, कसगीवाडी, गुंजोटीवाडी, पळसगाव, नागराळ, औराद, बोरी, दाबका, वागदरी, चिंचकोट, पारसखेडा, निलूनगर तांडा, नळवाडी, वरणाळवाडी, कलदेव निंबाळा, भुसणी, दस्तापूर, गणेशनगर आणि कंटेकुर या गावांचा यात समावेश आहे. ----- १५९ गणेश मंडळांना परवाने उमरगा शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठ्या २०३ मंडळांनी गणेशमूर्तींची स्थापना केली आहे. गणेश मंडळांसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा परवाना बंधनकारक करण्यात आला असून, मंडळांना ऑनलाइन परवाना घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत ७४ मंडळांची ऑनलाइन अधिकृत नोंदणी झाली आहे. मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८७ मंडळांना अधिकृत परवाने मिळाले आहेत. नोंदणीची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले. ----- गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याची उमरगेकरांची परंपरा आहे. उत्सव काळात डीजेला परवानगी नाही. मंडळांनी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देऊन उत्सवाची शांततामय परंपरा जपावी. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. -प्रल्हाद सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक, उमरगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : सरकारने कितीही चांगली कामगिरी केली, तरी त्यावर टीका करणे हेच विरोधी पक्षाचे काम- खासदार उपेंद्र कुशवाह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT