छत्रपती संभाजीनगर

४४६ शेतकऱ्यांनी केली ८१ मेट्रिक टन खताची नोंदणी

CD
४४६ शेतकऱ्यांनी केली ८१ मेट्रिक टन खताची नोंदणी ----- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. २४ : खरीप हंगामातील खत खरेदीसाठी होणारी शेतकऱ्यांची धावपळ कमी करण्यासह खतांचा काळाबाजार, चढ्या दराने विक्री आणि खतांसोबत इतर निविष्ठांची सक्तीने जोडणी रोखण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन खत बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यात आतापर्यंत ४४६ शेतकऱ्यांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून खताची नोंदणी केली आहे. त्यातून ८१ मेट्रिक टन खताचे बुकिंग झाले असून, त्यापैकी ३६ मेट्रिक टन खताची उचल करण्यात आली आहे. ऑनलाइन खत बुकिंगची सुविधा २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खतासाठी दुकानांमध्ये चकरा मारण्याची गरज पडू नये, तसेच कोणत्या दुकानात कोणते खत उपलब्ध आहे, याची माहिती घरबसल्या मिळावी, हा या सुविधेमागील उद्देश आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत उपलब्ध करून देणे आणि खत विक्रीतील अनियमिततेला आळा घालणे, यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. ---- अशी करा खताची ऑनलाइन नोंदणी खताचे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड किंवा फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईलमध्ये ‘एफएफएस फर्टिलायझर’ हे ॲप डाउनलोड करावे लागेल. या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध खतांची माहिती घेऊन आवश्यक खताची नोंदणी करता येते. क्यूआर कोडच्या माध्यमातूनही बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येते. खताची नोंदणी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला ७२ तासांच्या आत खताची उचल करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बुकिंग करताना शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी उपलब्ध असलेला वेळ आणि आवश्यकतेनुसार खताचे प्रमाण यांचा विचार करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. --- खताची माहिती मिळण्यास मदत ऑनलाइन बुकिंगमुळे खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या खताची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. परिणामी, खतासाठी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरण्याचा त्रास कमी होईल. तसेच खतासोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती, चढ्या दराने विक्री आणि काळाबाजार यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. ---- ऑनलाइन बुकिंग सुविधाचा वापर करा शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने खत खरेदी करण्याऐवजी ऑनलाइन बुकिंग सुविधेचा वापर करावा. यामुळे खत वितरणातील पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना आवश्यक खत वेळेत मिळण्यास मदत होईल. - डॉ.नीलकुमार येतवाडे, कृषी विकास अधिकारी ---- काळ्या बाजारालाही बसणार आळा शेतकऱ्यांना घरबसल्या खताचे बुकिंग करता यावे आणि कोणत्या दुकानात कोणते खत उपलब्ध आहे, याची माहिती मिळावी, यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक खताची नोंदणी करता येईल. खतासोबत इतर निविष्ठांची सक्तीने विक्री, चढ्या दराने खत विक्री आणि काळाबाजार यांना आळा घालण्यास मदत होणार आहे. --- 72 तासाच्या आत उचलणे आवश्यक शेतकऱ्यांनी आधार कार्ड किंवा फार्मर आयडीच्या आधारे ॲपवर नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा. बुकिंग केल्यानंतर ७२ तासांच्या आत खताची उचल करावी. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

MUMBAI INDIANS: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणखी एका प्रशिक्षकाची एंट्री; राजस्थान रॉयल्ससोबतही केलंय काम

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT