aurangabad 2 
छत्रपती संभाजीनगर

राज्यातील पहिल्या ऑनलाइन सभेची औरंगाबाद मिनीमंत्रालयात मुहूर्तमेढ

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : कोविड -19, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने सामाजिक अंतर पाळणे व इतर सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व संवैधानिक सभा, तसेच विषय समित्यांच्या सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र औरंगाबाद मिनिमंत्रालयात शासनाच्या निर्देशाआधीच ऑनलाइन सभा घेतल्या जात असून हायटेक तंत्रज्ञानात बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई रामराव शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले आणि सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी शासनाच्या सूचना प्राप्त होण्याआगोदरच ऑनलाइन सभा घेण्यास सुरुवात करून आधी केले मग सांगितले. या उक्तीप्रमाणे आपल्या कार्याची झलक दाखवून दिली आहे.                    

एप्रिलपासूनच सुरू केल्या ऑनलाइन सभा... 

औरंगाबाद जिल्हा परिषदेत एप्रिल महिन्यापासूनच ऑनलाइन सभेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे विविध भागांतून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सभेसाठी हजर राहणे जिल्हा परिषद सदस्यांना शक्य नव्हते. शिवाय कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराचा धोका होण्याची शक्यता होतीच.  परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बैठका या ठराविक वेळेत घेणे बंधनकारक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांच्याशी बनसोडे यांनी ऑनलाइन सभा घेण्याविषयी सविस्तरपणे चर्चा केली. ऑनलाइन सभा कशी असेल याचे प्रात्यक्षिकही मीनाताई शेळके आणि डॉ.गोंदावले यांना दाखविण्यात आले. बनसोडे यांच्या नाविन्यपूर्ण आशा या संकल्पनेला मीनाताई आणि डॉ.गोंदावले यांनीही क्षणाचाही विलंब न लावता ग्रीन सिग्नल दिले आणि राज्यातील सर्वात पहिली ऑनलाइन सभा घेण्याचा बहुमान औरंगाबादच्या जिल्हा परिषदेला मिळाला.                 

आगोदर घेतली ऑनलाइन स्थायी समिती सभा... 
     
औरंगाबाद जिल्हा परिषदेत आगोदर स्थ्यायी समितीची ऑनलाइन सभा घेण्यात आली. स्थ्यायी समितीच्या ऑनलाइन सभा यशस्वीपणे पार पडल्यानंतर २४ एप्रिल रोजी ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेऊन ती देखील शिरीष बनसोडे यांनी यशस्वी करून दाखविली. मीनाताई शेळके, डॉ.गोंदावले आणि बनसोडे यांच्या पुढाकारातून औरंगाबाद जिल्हा परिषदेने घेतलेल्या ऑनलाइन  सभेबाबत शासनालाही कळविण्यात आले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या यशस्वी झालेल्या ऑनलाइन सभेची माहिती जिल्हा परिषद नांदेड, रत्नागिरी यांनी देखील जाणून घेतली होती. या दोन्ही जिल्हा परिषदांनाही औरंगाबाद जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाइन सभेबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. औरंगाबादच्या धर्तीवरच वरिल दोन्हीही जिल्हा परिषदांनी ऑनलाइनच्या  सभा घेतल्या होत्या. अशा प्रकारे औरंगाबाद जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिली ऑनलाइन सभा घेणारी जिल्हा परिषद ठरल्याने सर्वत्र अभिनंदनास पात्र ठरली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT