छत्रपती संभाजीनगर

ऑनलाइन खरेदी केली पण पैसे परत मिळाले नाहीत तर?

CD
---- ((((ग्राहक हक्क)))) ऑनलाइन खरेदी केली पण पैसे परत मिळाले नाहीत तर? आज मोबाइलवर दोन मिनिटांत वस्तू मागवता येतात. कपडे, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरातील सामान इतकेच काय तर जेवण आणि औषधेही ऑनलाइन मिळतात. मात्र वस्तू आवडली नाही, चुकीची वस्तू आली किंवा ऑर्डर रद्द झाली तर पुढचा प्रश्न सुरू होतो तो म्हणजे पैसे परत कधी मिळणार? अनेकदा ग्राहकांना Refund will be processed shortly, Your request has been forwarded अशी उत्तरे दिली जातात. काही वेळा ग्राहक सेवा केंद्राकडून एकामागून एक तक्रार क्रमांक दिले जातात पण प्रत्यक्षात पैसे परत मिळण्यासाठी ग्राहकाला अनेक दिवस पाठपुरावा करावा लागतो. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ हा केवळ दुकानातून वस्तू घेतलेल्या ग्राहकांसाठी नाही. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही या कायद्याचे संरक्षण मिळते. वस्तूमध्ये दोष असेल, सेवा योग्य प्रकारे मिळाली नसेल किंवा ग्राहकाला चुकीची माहिती देऊन खरेदी करण्यास प्रवृत्त केले असेल, तर ग्राहकाला कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत. विशेषत ऑनलाइन व्यवहारात जाहिरात आणि प्रत्यक्ष वस्तू यामध्ये फरक असणे, लपविलेले शुल्क आकारणे, रिफंड देण्यास अनावश्यक विलंब करणे किंवा ग्राहकाची तक्रार योग्य पद्धतीने न हाताळणे या बाबी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येक छोट्या वादासाठी थेट न्यायालयात जाणेही योग्य नाही. ग्राहकाने सर्वप्रथम ऑर्डरची माहिती, बिल, पेमेंटचा पुरावा, ई मेल, चॅट आणि कंपनीसोबत झालेला पत्रव्यवहार जपून ठेवावा. त्यानंतर संबंधित कंपनीकडे लेखी तक्रार करावी. प्रश्न सुटला नाही तर ग्राहक आयोगाचा मार्ग खुला आहे. ग्राहक म्हणून आपला अधिकार माहिती असणे ही आज गरज आहे. पैसे दिले म्हणजे वस्तू मिळाली आणि विषय संपला एवढेच ग्राहकाचे नाते नाही. योग्य वस्तू, योग्य सेवा आणि योग्य व्यवहार मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. आणि हा हक्क वापरण्यासाठी सर्वांत आधी ग्राहकाने स्वतः जागरूक होणे गरजेचे आहे. - ॲड. अमोल वाघमारे ९०६७१२९२२२ ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारीही कोर्ट चालूच राहणार! सर्वोच्च न्यायालयात उद्या विशेष सुनावणी

केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय न झाल्यास कोगनोळी टोल नाक्यावर बेमुदत बंद, राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Marathi News Live Updates : मुंबईत ताब्यात घेतलेल्या ६०० आंदोलकांची सुटका

Microfinance : मायक्रोफायनान्स क्षेत्रात सुधारणा; कर्जपुरवठ्यात शिस्त आणि तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका

Amazon Great Indian Festival : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्ट; दीड लाख हंगामी नोकर भरती

SCROLL FOR NEXT