sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : कॅफेच्या नावावर मोकळे रान

जोडप्यांचे चाळे : गुन्हे शाखा पथक, दामिनीकडून तपासणी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एक काळ असा होता की, कॅफे म्हटलं की, सायबर कॅफे आठवत असे. सध्या ‘प्रायव्हसी’ जपण्यासाठी लावलेल्या काळ्या काचा, रंगीबेरंगी लावलेले पडदे, आलिशान फर्निचर असलेल्या कॅफेत जोडप्यांना मोकळे रान उपलब्ध करून दिले जाते. नाशिक जिल्ह्यात सर्रास प्रकार समोर आल्यानंतर राज्याचे पोलिस दल खडबडून जागे झाले होते.

त्यानुषंगाने क्रांती चौक परिसरातील पाहणी करणाऱ्या गुन्हे शाखा, दामिनी पथकाला वेगळाच प्रकार दिसला. दोन्ही पथकांनी सात डिसेंबरला छापा मारून चार जोडप्यांना पकडले. त्यांना क्रांती चौक ठाण्यात नेले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरून कीर्तन, आतून तमाशासारखा हा प्रकार घडला.

महिला, मुलींच्या सुरक्षेवर सर्वजण बोलतात, सुरक्षेचे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. सोशल मीडियावरही पाठलागाच्या घटना, क्लासेस, महाविद्यालयात विनयभंग, छेडछाडीच्या घटना समोर आलेल्या आहेत. शहरात विविध प्रकारच्या बनविलेल्या कॅफेत तरुण-तरुणींच्या गर्दीने रात्री उशिरापर्यंत फुल्ल झालेले असतात. अनेकदा कॅफेत कुटुंबासह जायची सोयच उरलेली नसते. याच अनुषंगाने शहर पोलिस दलाकडे ‘अशा’ कॅफेचालकांविरोधात काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या.

कॅफे’त चालते तरी काय?

नागरिकांकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अशा कॅफेत चालते तरी काय? हे पाहण्यासाठी गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सुधीर वाघ, दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या पथकाने छापा टाकला. तेव्हा कॅफेमध्ये चार जोडपे असभ्य वर्तन करताना दिसून आले. पोलिसांनी कॅफेची पाहणी केली तेव्हा जोडप्यांना एकांतात बसता येईल, अशी जागा तयार केल्याचे समोर आले.

एक अरुंद जिना चढून एकदा हे जोडपे वर गेले, की त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नसते. विशेष म्हणजे एक तास, दोन तास असा ठराविक वेळ बसण्यासाठी ठराविक पैसे आकारले जातात. कॅफेमध्ये मंद प्रकाश, बसण्यासाठी छोटे-छोटे सोफे ठेवलेले पोलिसांच्या पाहणीत आढळले. त्यानंतर महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने असभ्य वर्तन करणाऱ्या जोडप्यांना बाहेर काढून ठाण्यात नेत त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT