छत्रपती संभाजीनगर

वंचितच्या दालन उद्घघाटनविरोधात एमआयएम पक्षाची तक्रार

CD
आचारसंहिता लागू असताना दालनाचे उद्‍घाटन कसे? -- ‘वंचित’च्या विरोधात एमआयएम पक्षाची आयोगाकडे तक्रार -- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना महापालिका मुख्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्याच्या दालनाचे उद्‍घाटन कसे काय होऊ शकते, असा आक्षेप एमआयएमने घेतला. याप्रकरणी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी निवडणूक आयोगाकडे केली. महापालिकेतील वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान यांना दिलेल्या दालनावरून राजकारण पेटले आहे. जनतेने कररूपाने भरलेल्या पैशांची उधळपट्टी करत प्रशासनाने या दालनावर एक कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप एमआयएमने केला होता. ‘केवळ चार नगरसेवक असताना एवढे मोठे दालन कसे काय दिले? आमच्या पक्षाचे ३६ नगरसेवक असताना गटनेत्याला दालन मिळाले नाही?’ मंत्री अतुल सावे यांना अफसर खान यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केल्याने त्यांचे लाड केले जात आहेत’, असा आरोप समीर बिल्डर यांनी केला होता. हा वाद सुरू असतानाच बुधवारी (ता. १४) वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते अफसर खान यांच्या दालनाचे मोठ्या जल्लोषात उद्‍घाटन करण्यात आले. ढोल-ताशे वाजवून आणि फटाके फोडून आंबेडकरांचे महापालिकेत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमावर बिल्डर यांनी आक्षेप घेतला आहे. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असताना दालनाचे उद्‍घाटन कसे करता येऊ शकते? असा प्रश्न करत याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे बिल्डर यांनी सांगितले. शिवाय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडेदेखील तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. --- महापौर, आयुक्त ठरवून गायब? महापालिका मुख्यालयात हा कार्यक्रम सुरू असताना तत्कालीन महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे हे मुद्दाम महापालिकेत आले नव्हते. हा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनीच सूट दिली होती का, असा सवालही बिल्डर यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. -- सध्याचे खासदार दिसतात कुठे? वंचित बहुजन आघाडीने २०१९ मध्ये शहरात एका पक्षासोबत युती करून मोठी चूक केली होती. ही चूक २०२४ च्या निवडणुकीत संबंधित उमेदवाराचा पराभव करून आम्ही सुधारून घेतली, असे वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना बिल्डर म्हणाले, ‘कोणत्या एका व्यक्तीमुळे इम्तियाज जलील खासदार झाले नव्हते, जनतेने त्यांना विजयी केले होते. खासदार असताना त्यांनी शहराचे अनेक प्रश्न मार्गी लावले; पण सध्याचे खासदार संसदेत दिसतात कुठे’, असा प्रतिसवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT