Orange alert in Chhatrapati Sambhajinagar today Chance of heavy rain with lightning monsoon imd weather  esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून हा अलर्ट जारी करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शनिवारी (ता.१६) ऑरेंज तर रविवारी ( ता.१७) येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी कळवले आहे की, दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे सुटून विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

विजा चमकत असल्यास विजेच्या खांबाजवळ, झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच जागेवर व झाडावर चढु नका.धातुंच्या वस्तुपासुन दुर रहा तसेच प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा अशावेळी वाहनातुन शक्यतो प्रवास करु नका. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका व मोबाईलाचा वापर टाळा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT