उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकहाती सत्ता; आघाडीचा महाविजय,भाजपचा पराभव sakal media
छत्रपती संभाजीनगर

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकहाती सत्ता; आघाडीचा महाविजय,भाजपचा पराभव

महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांनी भाजपला अंतर्गत मदत करूनही भाजपला विजयासमीप पोचता आलेले नाही.

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक झाली. सोमवारी (ता. २१) झालेल्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे १० उमेदवार विजयी झाले. भाजपच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. बँकेचे एकूण १५ संचालक असून, यापूर्वी महाविकास आघाडीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता बँकेत सर्वच संचालक महाविकास आघाडीचे राहणार आहेत.

ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी झाली. यामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांनी भाजपला अंतर्गत मदत करूनही भाजपला विजयासमीप पोचता आलेले नाही. यामुळे आघाडीचे फुटलेले नेतेदेखील तोंडघशी पडल्याचे दिसून आले. पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सुरुवातीला ही निवडणूक एकतर्फी होणार असे वाटत होते. पण, प्रचारात भाजपने ताकद लावण्याने चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत८०८ मतदारांपैकी ७९८ जणांनी हक्क बजावला.

उपाध्यक्षांचा पराभव

आमदार राणाजगजितसिंह पाटील गटाच्या गेल्यावेळी आठ जागा निवडून आल्या होत्या. नंतर ते पक्ष बदलून भाजपमध्ये गेले. ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. पण, त्यांना यावेळी एकही जागा जिंकता आली नाही. शिवाय बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष कैलास शिंदे व संचालक सतीश दंडनाईक दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राणा पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर स्थानिक पातळीवरील पहिलीच निवडणूक होती. त्यामध्ये त्यांचा झालेला पराभव इतरही निवडणुकीवर परिणामकारक ठरू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.

सत्तेतील तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन भाजपविरुद्ध लढावे लागले. यातच सर्व काही आले. काही अपप्रवृत्तीच्या हातात कारभार जाऊ नये, बँकेची सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा तेरणा कारखान्यासारखी होऊ नये यासाठी निवडणूक लढविली. पराभवाची कारणमीमांसा व आत्मचिंतन करू. जनतेचा कौल मान्य आहे.

- राणाजगजितसिंह पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

SCROLL FOR NEXT