नागपूरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू  
छत्रपती संभाजीनगर

हृदयद्रावक! वीज कोसळून १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करूण अंत

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात काटगाव-घटेवाडी शिवारात पावसापासून स्वतःचा आणि शेळ्यांचा बचाव व्हावा, म्हणून धर्मेंद्र कोळी हा १२ वर्षीय मुलगा त्याच्या शेळ्यांसह झाडाच्या आडोशाला बसला होता.

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील काटगाव नजीकच्या घटेवाडी शिवारात हृदयद्रावक दुर्घटना घडली. बुधवारी (ता.पाच) सायंकाळी वादळी वाऱ्यात वीज (Lightning) कोसळून घडलेल्या दुर्घटनेत शेळ्या राखण्यास गेलेल्या १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करुण अंत झाला. धर्मेंद्र मसाप्पा कोळी असे मृत बालकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले. या आठवड्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. उस्मानाबाद (Osmanabad) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि वादळ-वाऱ्याचा तडाखा बसत आहे. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात काटगाव-घटेवाडी शिवारात पावसापासून (Untimely Rain) स्वतःचा आणि शेळ्यांचा बचाव व्हावा, म्हणून धर्मेंद्र कोळी हा १२ वर्षीय मुलगा त्याच्या शेळ्यांसह झाडाच्या आडोशाला बसला होता. (Osmanabad Live Updates Lightning Kills Child With Goats In Tuljapur)

वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटात त्या झाडावर वीज कोसळून धर्मेंद्र आणि त्याच्या २६ शेळ्यांचा करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.या दुर्घटनेची खबर मिळताच नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत इटकळ पोलिस चौकीचे पोलिस हवालदार विलास जाधव, पोलिस कॉन्स्टेबल अतुल साळुंके, मंडल अधिकारी शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. वीज कोसळून शेळ्या राखण्यास गेलेल्या धर्मेंद्रचा करून अंत झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT