कोरोनाच्या काळात  उस्मानाबाद जिल्ह्यातील आठवडे बाजारात तोबा गर्दी होत आहे.
कोरोनाच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील आठवडे बाजारात तोबा गर्दी होत आहे. उस्मानाबाद
छत्रपती संभाजीनगर

आठवडे बाजारात तोबा गर्दी, प्रशासन निर्णय घेऊन बसले गप्प

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये (Osmanabad District) कोरोनाचा कहर सुरु असतानाही आठवडे बाजारात (Weekly Market) तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. आठवडे बाजाराला परवानगी नसतानाही अशी गर्दी होत असल्याने कोरोना (Corona) आहे यावर विश्वासच बसणार नाही. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असाच प्रश्न यानिमित्तानं समोर आला आहे. लोकांनीही नियमाच पालन न करता थेट खरेदीसाठी अशी गर्दी करुन स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. शेतकर्‍यांचा (Farmer Sells Their Vegetable) भाजीपाला विकण्यासाठी प्रशासनाने नियमावली करण्याची गरज होती. मात्र तसा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजुला शहरासह जिल्ह्यात रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. पण दुसर्‍या बाजुला अजुनही नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसत नाही. (Osmanabad Live Updates Still Weekly Market Run Across District)

अशावेळी प्रशासनाकडून कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. या आठवडे बाजारात अनेकांच्या चेहर्‍यावर मास्क सुध्दा पाहायला मिळाले नाहीत. अशा गंभीर परिस्थितीमध्ये असा बाजार भरणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण दिल्यासारखेच आहे. बाजार न भरवता तात्पुरत्या स्वरुपात काही चौकात बाजाराचे विक्रेंद्रीकरण करणे अत्यावश्यक होते. यामुळे गर्दीवर नियंत्रण आणता येते. एकाच ठिकाणी अशी गर्दी निर्माण होणे यामुळ टाळता येऊ शकते. शिवाय ठराविक वेळेत गल्लोगल्ली भाजीपाला विक्रेत्यांना नियमाचे पालन करुन भाजी विक्री करायला परवानगी मिळाल्यास त्यामुळे नागरिक अशी गर्दी करणार नाहीत.

पण प्रशासनाच्या गलथानपणाचा हा कहर आहे. नुसती बंदी आणून व निर्णय घेऊन ते मोकळे झालेत. पण निर्णयाची अंमलबजावणी होत आहे का? याचा सुद्धा त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करणे अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यामध्ये मृत्युचा आकडा भयानक वाढला असुन याचा जराही परिणाम या बाजाराकडे पाहिल्यावर दिसत नाही. फक्त भाजीपाला खरेदी करण्यासाठी जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे? याचाही विचार सामान्य नागरिकांनी करणे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT