oxygen plant oxygen plant
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद महापालिकेचा ऑक्सिजन प्लांटच ऑक्सिजनवर!

शासन निर्णय होईना; त्यामुळे प्रशासन मोठ्या संभ्रमात आहे

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गाच्या (covid 19) पहिल्या लाटेपासून चर्चेत असलेला महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरचा ऑक्सिजन प्लांट (oxygen plant) अद्याप कार्यान्वित झालेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून निधी मंजूर झालेला ऑक्सिजन प्लांट प्रशासनाने रद्द केला व राज्य शासनातर्फे सीएसआर फंडातून (csr fund) ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यासंदर्भात अद्याप राज्य शासनाने निर्णय दिलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली होती. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी लिक्वीड ऑक्सिजनचा प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महापालिकेला साडेचार कोटींचा निधी दिला. त्यानुसार काम सुरू करण्यात आले. पण लिक्वीड ऑक्सिजन प्लांटबद्दल शासनाचे धोरण बदलले आणि या प्लांटचे काम बंद करण्यात आले.

दरम्यान हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे दोन प्लांट राज्याच्या पर्यटन व पर्यावरण मंत्रालयाच्या माध्यमातून औरंगाबादला देण्याची घोषणा मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरसाठी मंजूर झालेले हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे दोन प्लांट घाटी रुग्णालयाला दिले. आदित्य ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार दोन प्लांट मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरसाठी उभारले जातील, हे निश्‍चित मानले जात होते. मात्र अद्याप ऑक्सिजन प्लांटसाठी कुठल्याही हालचाली सुरू नाहीत. लेखी आदेश आणि आर्थिक तरतुदीबाबत आदेश नसल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT