sakal
छत्रपती संभाजीनगर

पाचोड: वीरभद्रा नदीत एक बेपत्ता, एकजण बचावला

नांदर येथील घटना : रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरूच

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : गावालगत वीरभद्रा नदीवर उभारलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले दोन तरुणांपैकी एका जणास वाचविण्यास ग्रामस्थांना यश आले असून एक जण मात्र बेपत्ता झाल्याची घटना पैठण तालुक्यातील नांदर येथे बुधवारी (ता.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सायंकाळपर्यंत सदर तरुणाचा शोध न लागल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत पाण्यात बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध सुरूच होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदर येथे गावालगत वीरभद्रा नदीवर उभारण्यात आलेला सिमेंट बंधारा यंदा तुडूंब भरून ओसंडून वाहत असल्याने गावांतील मनोज बाळासाहेब उर्फ दशरथ काळे (वय २२ वर्षे), कार्तिक दत्तात्रय काळे ( वय २३, दोघे रा.नांदर) हे बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडाले, त्यातच बंधारा ओसंडून वाहत असल्याने ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागले.

यावेळी कार्तिक काळे यास वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले, तर मनोज काळे बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडून आला नाही. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे किशोर शिंदे, फिरोझ बरडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची महसुल प्रशासनाला माहिती दिली. सायंकाळपर्यंत सदर तरुणाचा शोध न लागल्याने शोधमाेहीम थांबविण्यात आली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत पाण्यात बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध सुरूच होता.

पाण्याचा अंदाज न आल्याने घात झाला

मनोज काळे यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असावा असा ग्रामस्थांनी अंदाज वर्तविला आहे. हे दोघे बुडत असल्याचे पाहून जवळच असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु काही क्षणात मनोज बेपत्ता झाला. तर कार्तिक यास वाचविण्यात यश आले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गाव पसरली असता शेकडो जणांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी पाण्यात उडी घेऊन बेपत्ता मनोजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अयशस्वी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT