Pachod Two youths were robbed four men with knife sakal
छत्रपती संभाजीनगर

पाचोड : चाकूहल्ला करून दोन तरुणांना चौघांनी लुटले

दावरवाडीजवळील घटना : पाचोड ठाण्यात गुन्हा नोंद

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : गावाबाहेर शौचास गेलेल्या दोन तरुणांवर अज्ञात चार जणांनी चाकू हल्ला करून लुटल्याची घटना दावरवाडी (ता.पैठण) शिवारात मंगळवारी (ता.२२) रात्री घडली असून चोरट्यांनी दोन मोबाईलसह हातातील घड्याळ घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील दावरवाडी शिवारात मंगळवारी (ता.२२) रात्री दावरवाडीतील प्रकाश औटे, प्रीतमकुमार एडके हे दोघे शौचास गेले होते. ते पुन्हा गावाकडे येत असताना त्यांच्यावर चार जणांनी अचानक हल्ला करून प्रकाश औटे याच्या पाठीच्या उजव्या बाजूला चाकू भोसकून गंभीर जखमी केले. तर प्रीतमकुमार यास जबर मारहाण करून त्यांच्याकडील चाळीस हजाराचे दोन मोबाईल व दोघांच्या हातातील घड्याळ घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

यावेळी प्रकाश व प्रीतमकुमार यांचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्याकडे धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पळत होते. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु ते चार चोरटे एका दुचाकीवर बसून पळून गेले. जखमी दोघांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाणेचे सपोनि. गणेश सुरवसे, फौजदार सुरेश माळी, जमादार प्रशांत नांदवे, पवन चव्हाण, शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता बुधवारी (ता. २३) पहाटे साष्टपिंपळगाव (ता.अंबड) परिसरात मोबाईलचे लोकेशन दिसून आले. यामुळे पाचोड पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, पोलिस आल्याचे कळताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दुचाकी सोडून पसार झाले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार प्रशांत नांदवे, पवन चव्हाण हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT