छत्रपती संभाजीनगर

नव्या स्वच्छतागृहास कुलूप

CD
ABD26J80754 सेनगाव ः पानकनेरगाव जि.प. शाळेत स्वच्छतागृहास लावलेले कुलूप. ----------------------- पानकनेरगाव जि.प. शाळेत नव्या स्वच्छतागृहास कुलूप विद्यार्थ्यांची कुचंबणा; आरोग्याशी खेळ सेनगाव, ता.५ (बातमीदार) : तालुक्यातील पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले. मात्र, काम होऊनही या स्वच्छतागृहास कुलूप लावून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असून, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावसह काही जिल्हा परिषद शाळांत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते तातडीने विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले करणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. संबंधित बांधकाम कंत्राटदाराचे स्वच्छतागृहाचे शासकीय देयके बाकी असल्याने, त्याने थेट स्वच्छतागृहास कुलूप ठोकल्याची माहिती समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक स्वच्छतागृह कुलूपबंद ठेवल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. असे केल्याने कंत्राटदाराचे पैसे तत्काळ मिळतील का? असा सवाल पालकवर्गातून विचारला जात आहे. प्रशासनाकडून निधी मिळवण्यासाठी अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांवर टाच आणण्याऐवजी, कंत्राटदाराने प्रशासनाकडे स्वतः पाठपुरावा करणे गरजेचे असतानाही ही गैरसोय विद्यार्थ्यांवर लादली जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घेऊन कुलूपबंद स्वच्छतागृह तत्काळ विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT