छत्रपती संभाजीनगर

पाचुंदा गाव पंधरा दिवसांपासून अंधारात

CD
((लीड)) ABD26J79451 --- पाचुंदा गाव सतरा दिवसांपासून अंधारात ---- डीपी नादुरुस्त; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीविरोधात संताप ---- वानोळा, ता. १५ : पाचुंदा (ता.माहुर) येथील विद्युत डीपी नादुरुस्त झाल्याने मागील सतरा दिवसांपासून संपूर्ण गाव रात्री विजेविना अंधारात आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून अपेक्षित पाठपुरावा होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पाचुंदा येथील विद्युत डीपी नादुरुस्त होऊन महिना उलटत आला तरी त्याची दुरुस्ती अथवा नवीन डीपी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण गावात अंधार पसरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, पाणीपुरवठ्यासह दैनंदिन व्यवहारही विस्कळीत झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. --- वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन सरपंच आणि सदस्यांना गावकऱ्यांच्या मूलभूत सुविधांविषयी काहीच देणे-घेणे नाही. ते फक्त स्वतःच्या राजकारणात मग्न आहेत. गाव अंधारात असल्याने मुलांना अभ्यास करता येत नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे, असा इशारा ग्रामस्थ बालाजी चव्हाण यांनी दिला आहे. ---- ((कोट)) ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे ढिसाळ आहे. गावावर ही वेळ केवळ नाकर्तेपणामुळे आली आहे. महिनाभरापासून डीपी बंद आहे; मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. जनतेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. -संजय चव्हाण, ग्रामस्थ. --- ((कोट)) रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या प्राण्यांचा तसेच चोरांपासून धोका निर्माण झाला आहे. लहान मुले आणि वृद्धांनी अंधारात कसे राहायचे? ग्रामपंचायतीच्या या कारभाराविरोधात आता गप्प बसणार नाही. थेट वरिष्ठांकडे जाऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करणार आहोत. -सुदाम चव्हाण. --- ((कोट))) ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे नुसता सावळागोंधळ सुरू आहे. गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंचांनी काय केले? आगामी निवडणुकीत या प्रकाराचा जाब जनतेकडून विचारला जाईल. -बंडू राठोड. --- ((कोट))) भोकर येथील कार्यकारी अभियंत्यांकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. येत्या काही दिवसांत नवीन डीपी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीही गावात दोन वेळा डीपी देण्यात आले. -प्रीतम वसमतकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, माहूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT