छत्रपती संभाजीनगर

पैनगंगा नदी कोरडीठाक! सवना परिसरात दुष्काळाचे सावट

CD
ABD26J81570 सवना ः पैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी ऑक्टोबरमध्ये भरलेले असते. पण, आता ते कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. (छाया : अमोल नायक) ----- पैनगंगेचे पात्र कोरडेठाक ---- सवना परिसरात बॅरेजचा तळ उघडा ---- सवना, ता. १७ (बातमीदार) : मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र ऑक्टोबर महिन्यातच कोरडे पडल्याने सीमावर्ती भागात भीषण पाणीटंचाईचे विदारक चित्र समोर आले आहे. अपुऱ्या पावसामुळे नदीवरील विविध बॅरेजमधील जलसाठा पूर्णपणे आटला असून, काही ठिकाणी केवळ अत्यल्प पाणी शिल्लक आहे. परिणामी, सेनगाव तालुक्यातील सवना परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचे मोठे संकट ओढवले आहे. दरवर्षी मुबलक पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा आधार मिळायचा. मात्र, यंदा नदीचे पात्र वाळवंटासारखे भासू लागल्याने हिवाळी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. जलस्रोत आटल्यामुळे रब्बी हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे. --- रब्बीचे क्षेत्र घटणार पावसाने ओढ दिल्याने जमिनीत ओलावा उरलेला नाही. शेतातील हळद, तूर आणि कापूस ही पिके सध्या धोक्यात आली आहेत. भूजल पातळी खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. --- पशुधनाची पाण्यासाठी भटकंती नदीतील पाणी आटल्याने परिसरातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी जंगलात दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यातच चाराटंचाईचे संकट उभे ठाकल्याने जनावरांना पाणी आणि चारा कसा पुरवायचा, या विवंचनेत पशुपालक शेतकरी सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT