छत्रपती संभाजीनगर

गुद्याने नाही, मुद्याने नेतृत्व करा; आंतरवली दत्तक घेण्याची पंकजताई मुंडेंची घोषणा

CD
गुद्याने नाही, मुद्याने नेतृत्व करा --- मंत्री पंकजा मुंडे यांना ‘जेन झी’ना सल्ला --- बीड, ता.२० :‘‘फ्रान्स, पॅरिसमधील आंदोलने किंवा रशिया-युक्रेन, अमेरिका- इराणदरम्याच्या युद्धाच्या आपण रील्स बघतो. पण, आपल्याला असा देश किंवा अशी तरुण पिढी नको, जिच्या मनात देशभक्ती नाही. तरुणांच्या रक्तात देशभक्तीचे टॉनिक भिनवण्याची गरज आहे. स्वतःचे घर आणि देश जाळून आंदोलन करणारे तरुण नकोत, तर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे देश पुढे नेणारे सैनिक हवेत’’, असे मत पर्यावरण मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. ‘‘नेतृत्व हे मुद्याने केले पाहिजे, गुद्याने नाही’’, असा सल्ला त्यांनी जेन झींना दिला. सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील श्रीक्षेत्र भगवान भक्तिगडावर मंगळवारी (ता. २०) झालेल्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. दुष्काळाच्या सावटाखाली मेळावा होणार का, अशी शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना पंकजा मुंडे यांनी चोख प्रत्युत्तर आणि गर्भीत इशारा दिला. ‘‘एखाद्या कुत्र्याला दगड मारला तर तो केकाटत जाईल; पण मधाच्या पोळ्याला दगड मारला तर काय होते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. माझा मेळावा, माझी वाटचाल हे माझे मधाचे पोळे आहे. माझे सगळे वाघ उन्हातले आणि डोंगरातले आहेत. या वाघांना ऊन कधीच लागत नाही. तुम्ही माझी खरी शक्ती आहात आणि गोपीनाथ मुंडे परिवार तुमचे उपकार कधीही विसरू शकत नाही. एका क्षणात निर्णय घेऊन भगवान भक्तिगड स्थापन केला. ही लेकीची ताकद आहे. मधमाशा ज्याप्रमाणे कष्ट करून मध गोळा करतात, तशीच माझी लेकरे कष्ट करतात आणि त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून संपूर्ण जीवन वाहून टाकले आहे’’, असे त्या म्हणाल्या. अंतरवाली गाव दत्तक घेणार -- दुष्काळ कधीही जात-पात किंवा श्रीमंत-गरीब बघत नाही. तहान सगळ्यांना सारखीच लागते. त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीत आपल्याला माणसामाणसांतील, जातीपातीच्या भिंती मनगटाने मोडून टाकायच्या आहेत. याच भूमिकेतून आपण अंतरवाली (ता. अंबड, जि. जालना) गाव दत्तक घेत आहे. तिथे बीड जिल्ह्यासारखाच विकास करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

शिवा शर्मा हत्याकांड: लखनऊमधून फरार झालेली श्रद्धा दुबे नागपुरात सापडली; बहीण अन् चालकही अटकेत, ११ दिवस पोलिसांना गुंगारा

Team India : जसप्रीत बुमराहने २०२७ च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये खेळू नये! कुणी दिलाय हा सल्ला?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ठाकरेंच्या मेळाव्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावरून शेकडो शिवसैनिक रवाना; राजन विचारे व केदार दिघे यांच्या उपस्थितीने वेधले लक्ष.

‘हा सोनू, हा मोनू’; संताच्या मांडीवर डोकं ठेवून बिस्किटं खातात दोन अस्वल, VIDEO पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT