Pankaja Munde Sakal
छत्रपती संभाजीनगर

Pankaja Munde : पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी; बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

Beed Politics : केंद्रीय पातळीवर चर्चा होऊन पंकजा मुंडेंसह पाच जणांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना सोमवारी पक्षातर्फे विधान परिषदेवर उमेदवारी घोषित झाली. यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभेत पराभव झाल्यापासून त्यांचे पक्षातर्फे पुनर्वसन करा, अशी मागणी समर्थकांच्या माध्यमातून सातत्याने होत होती. पंकजा यांचे राज्यसभा, विधान परिषदेसाठी वेळोवेळी संभाव्य यादीत नाव येत होते.

पण, पाच वर्षांत काही नंबर लागला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

यानंतर महाराष्ट्रातील समीकरणे बघता व ओबीसी, मराठा आरक्षण प्रश्न, तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना पद देणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन केंद्रीय पातळीवर चर्चा होऊन पंकजा मुंडेंसह पाच जणांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.

पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, यशःश्री निवासस्थान, धनंजय मुंडे यांचे जगमित्र कार्यालय याठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळत पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Pune News: थरारक जलक्रीडांनी रंगला ‘रिगाटा महोत्सव’; पुण्यात ९८ वर्षांच्या परंपरेचा जलतिमाही उत्सव, नौकांची धमाल!

Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

SCROLL FOR NEXT