पंकजा मुंडे
पंकजा मुंडे 
छत्रपती संभाजीनगर

मुंडे साहेबांचा लाडका राजीव गमावला, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

गणेश पिटेकर

औरंगाबाद : काँग्रेसचे नेते तथा राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Rajee Satav) यांचे आज रविवारी (ता.१६) पुण्यात कोरोनामुळे (Corona) निधन झाले. यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, सामान्य समाजासाठी धडपडणारा एक तरुण उमदा युवा नेता राजीव सातवच्या रुपाने आज आपण गमावलेला आहे. या क्रूर कोरोनाने ज्याने आपले आयुष्य काष्टामध्ये घालवून अनेक लोकांचे हात एका जीवनाला लागतात जेव्हा तो एका उंचीवर गेलेला असतो आणि त्या उंचीवरुन तो अनेक जीवनांना स्पर्श करित असतो. अशा प्रवासाचे उदाहरण असलेल्या राजीव सातवचा घात या कोरोनाने केलाय. (Pankaja Munde Said, We Lost Munde Saheb Favorite Rajeev)

मी मनापासून दुःख व्यक्त करते. सातव परिवाराच्या दुःखामध्ये समस्त मुंडे परिवार सहभागी आहे. आज काँग्रेसने (Congress) चांगला उमदा युवा नेता गमावलाच आहे. पण मुंडे साहेबांचा लाडका राजीव हा सुद्धा गमावला आहे. खूप लाकडा हा युवक होता. युवकांना आपण सहकार्य केले पाहिजे. सामान्य समाजासाठी झटणाऱ्या युवकांना आपण मदत केली पाहिजे, असे मुंडे साहेबांना वाटत होते. आज त्यांच्या जाण्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते, अशा भावना पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या व्हिडिओ संदेशात व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT