Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा पुन्हा राडा; भागवत कराडांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

सकाळीच काही कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. सकाळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता पुन्हा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली. (Pankaja Munde supporters attempt to block Bhagwat Karad convoy)

काहीवेळापूर्वीच औरंगाबादमध्ये ही घटना घडली असून दोन कार्यकर्ते जे स्वतःला पंकजा मुंडेचे समर्थक असल्याचं सांगत होते. त्यांनी यापूर्वी देखील भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याच कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या क्रांती चौकातील कार्यालयाकडे येत अचानक घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

पंकजा मुंडेंना हेतुपुरस्सर डावललं जात असल्याचा निषेध करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला. पण आधीच तिथं तयारीत असलेल्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या समोर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची पोलिसांनी आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील होता. पण हे कार्यकर्ते गाडीतून उतरुन थेट घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांना ताब्यात घेऊन गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT