छत्रपती संभाजीनगर

सातबाऱ्यावर नावे नोंदवा मागणीसाठी पारधी समाजाचे धरणे

CD
सातबाऱ्यावर नावे नोंदवा पारधी समाजाचे धरणे आंदोलन धाराशिव, ता. १८ : तालुक्यातील ढोकी येथील गट नंबर ३५ मधील जमिनीवरून कोणतीही पूर्वसूचना न देता बेदखल केल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित जमिनीच्या सातबाऱ्यांवर नावे नोंदविण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजबांधवांनी गुरुवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. नाना कलाप्पा चव्हाण व इतर झोपडपट्टीधारकांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार, १२ सप्टेंबर २०२६ दुपारी १२ः३०च्या सुमारास प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली. या जमिनीवरील नियमित करण्यात आलेले अतिक्रमण जबरदस्तीने हटवून रहिवाशांना तेथून बेदखल करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. जमिनीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात तसेच महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे प्रलंबित आहे. यापूर्वी उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेत निकाल अर्जदारांच्या बाजूने लागलेला असताना आणि वरिष्ठ पातळीवर प्रकरण प्रलंबित असताना, पूर्वपरवानगीशिवाय करण्यात आलेली ही कारवाई रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रशासनाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. ......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT