परभणीत तिरडी आंदोलन sakal
छत्रपती संभाजीनगर

परभणी : कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे तिरडी आंदोलन

विद्यापीठच्या मुख्य प्रवेश द्वारासमोरच तिरडी आंदोलन केले

सकाळ वृत्तसेवा

परभणी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ता. ११ फेब्रुवारी रोजी घोषित केलेला असंतुलित, अन्यायकारक व तालिबानी नवीन अभ्यासक्रम तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता.१०) परभणीत तिरडी आंदोलन करण्यात आले.

नवीन अभ्यासक्रम हा जाणीवपूर्वक कृषी पदवीधारकांसाठी अतिशय अनुकूल बनविण्यात आला आहे. याव्दारे सर्व इतर विद्या शाखेच्या विद्यार्थांची निवड होणार नाही. याची पुरेपुर काळजी घेण्यात आल्याचे या विद्यार्थांचा आरोप आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम रद्द करावा अशी मागणी या विद्यार्थांची आहे. या इतर मागण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थांनी गुरुवारी (ता.१०) विद्यापीठच्या मुख्य प्रवेश द्वारासमोरच तिरडी आंदोलन केले. कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रम तयार करावा, ज्यामध्ये कृषी अभियांत्रिकी व कृषी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमास समान गुण भारांकन असावे, कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांना कृषी पदवीधारकाप्रमाणे मुख्य परीक्षेच्या पेपर १ व पेपर २ च्या अभ्यासक्रमात व गुण भारांकनाची समान संधी निर्माण करून द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT