छत्रपती संभाजीनगर

केल्याने होत आहे....

CD
दीपोत्सव लेख परभणी फोटोसह ------------------ केल्याने होत आहे... सध्या देशात आंदोलनाचे पीक जोमात आहे. विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून मार्ग अडविला जात आहे, धरणे दिली जात आहेत. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनकर्त्याकडे मांडण्याचा अधिकार आहे. विशेषतः समाजमाध्यमातून वातावरणनिर्मिती करून मागण्या आक्रमक पद्धतीने मांडल्या जात आहेत. यालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र, मुद्दा असा की, काही प्रश्न व्यक्तिनिष्ठ नसून व्यवस्थेत आहेत. शक्तीचा उपयोग सकारात्मक पद्धतीने करणे आवश्यक आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत, तेथे आपल्या क्षमतेनुसार सकारात्मक कार्य करू शकतो. ज्या प्रयत्नामुळे व्यवस्थाबदलाकडे एक पाऊल पडत आहे. - प्रसाद शिवाजी जोशी --------- ‘नो ॲडमिशन’ बोर्ड असलेली जि.प. शाळा साधारणपणे जि.प. शाळा म्हटले, की शिक्षकवर्ग निरुत्साही, दर्जेदार शिक्षणाचा अभाव आणि त्यामुळे पटसंख्या कमी असा समज रूढ आहे. परंतु, हा समज मोडीत काढणारी शाळा परभणी जिल्ह्यातील मानवत शहरात आहे. पीएमश्री केंद्रीय प्राथमिक शाळेची पटसंख्या आहे १५००. वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच आहेत. आता प्रवेश देण्यासाठी वर्गात जागाच शिल्लक नाही, म्हणून प्रवेश बंद करावा लागतो. पटसंख्या दीड हजारावर आणि जागा शिल्लक नाही म्हणून प्रवेश बंद करावा लागणे, हे खासगी शाळेबाबतचे वर्णन जेव्हा जिल्हा परिषद शाळेला लागू होते, तेव्हा त्यापाठीमागे निश्चितच प्रयत्नांचे सातत्य असते. विशेषतः ज्या शहरात पूर्वीपासून अनेक शाळा कार्यरत आहेत. पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे ओढा आहे, त्या शहरात जिल्हा परिषदेची शाळा अशा पद्धतीने उभी करणे यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठाच लागते. या प्रयत्नाचा प्रारंभ शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या माध्यमातून झाला आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर येथील शिक्षकवर्गाने मार्गक्रमण केले. प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याची आदर्श व्यवस्था निर्माण केली. यासाठी त्यांना कुठलाही वेगळा पगार किंवा पुरस्कार देण्यात आला नाही. या शिक्षकांनी व्यवस्थेविषयी कुठलीही तक्रार केली नाही. फक्त आपल्या क्षमता आणि शक्तीचा उपयोग सकारात्मक बदलासाठी केला. व्यवस्थाबदलाच्या दृष्टीने टाकलेले हे सर्वात प्रभावी पाऊल आहे. कारण, हे येथील विद्यार्थी ज्यावेळी त्यांच्या आवडीच्या कार्यक्षेत्रात उभे तर राहतीलच; परंतु ते देशाचे एक जबाबदार नागरिक असतील. आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संस्कार त्यांना त्यांच्या शिक्षकांकडून मिळालेला असेल आणि ज्यावेळी असे नागरिक घडतात,. त्याचवेळी देशाचा आणि समाजाचा विकास होतो. याचा आदर्श राज्यातील प्रत्येक शाळेने घ्यायला हवा. विशेषतः ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी मानवत येथील कार्यपद्धतीचा गांभीर्याने विचार करावा. कारण, ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या कुटुंबातील पाल्य या शाळेत शिक्षण घेतात. शहरात वास्तव्य करणाऱ्या आणि सर्व सोयी-सुविधा मिळत असलेल्या कुटुंबातील पाल्याच्या तुलनेत ते कुठेही कमी नसतात. फक्त त्यांना आवश्यक असते शिक्षकरूपी मूर्तिकारांची. ---- शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळणारे स्नेहवन समाजातील एखादी समस्या बघून तिच्याकडे दुर्लक्ष करणारे बहुसंख्येने आहेत, सहानुभूती असणारे आहेत, ती समस्या दूर व्हावी; परंतु त्यासाठी अन्य कोणी प्रयत्न करावेत असे वाटणारे आहेत आणि स्वतःची अतिशय सुरक्षित चौकट असताना मोडून समाजातील समस्या सोडविण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे हाताच्या बोटावर मोजता येतील असे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील अशोक देशमाने. संगणक अभियंता असलेले देशमाने हे पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीस होते. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असल्यामुळे चांगले वेतन आणि एकूणच सुरक्षित भविष्य होते. परंतु, देशमाने यांचा पिंड समाजसेवेचा. राज्यात व विशेषतः मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. अशा कुटुंबातील मुलांचे भविष्य अतिशय अंधकारमय असल्याचे दिसत होते. कर्जाचा डोंगर आणि अल्प उत्पन्न असल्यामुळे ही मुले शिक्षण सोडून रोजगाराकडे वळतात. एका अर्थाने त्या निष्पाप बालकांचे संपूर्ण भविष्य उद्‍ध्वस्त होते. ही परिस्थिती लक्षात येताच अशोक देशमाने यांनी एक निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या पाल्यांचे संगोपन करण्याचा. स्वतःच्या राहत्या घरात त्यांनी मुले सांभाळण्यास सुरवात केली. कामाचा व्याप वाढला. अनंत अडचणी येत होत्या. शेवटी एक धाडसी पाऊल उचलले. नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्याचे. घरातील कमावत्या मुलाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्याचा निर्णय किती कठीण असतो, हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असते. परंतु, ध्येयाविषयीची निष्ठा आणि दृढ संकल्प असल्यावर कोणतेही कार्य पार पाडणे शक्य होते. अशोक देशमाने यांच्या सामाजिक कार्याची सुरवात झाली. अनेक हातांनी सहकार्य केले आणि आज आळंदीजवळ स्नेहवन प्रकल्पात शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्नेहवन प्रकल्पाने या विद्यार्थ्याचे भविष्य अंधकारात जाण्यापासून वाचवले आहे. --------------- सामूहिक प्रयत्नांनी पाणीपातळीत वाढ ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळाला, की रग्गड पैसा देणारी नोकरी पक्की, मग लग्न आणि पुन्हा आयुष्यभर पैसा कमावून बंगला, गाडी आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा मिळविणे हे कोणत्याही सर्वसामान्य विद्यार्थ्याचे आयुष्याचे स्वप्न असते. परंतु, आयआयटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा कुठलीही नोकरी न करता पूर्णवेळ सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतो, तेव्हा त्यामागे मोठा विचार असतो. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अंबाजोगाई येथील प्रसाद चिक्षे. विद्यार्थीदशेत असताना ज्ञानप्रबोधिनी संस्थेशी संपर्क आला आणि व्यक्तिगत संपत्ती निर्माण करण्यापेक्षा आयुष्यभर समाजहिताचे कार्य करण्याचे निश्चित केले. अंबाजोगाई तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. पाणीपातळी खोलवर गेली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रसाद चिक्षे यांनी काम सुरू केले. तालुक्यातील अनेक गावांत ग्रामसभा घेतल्या. नागरिकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. सर्वात उल्लेखनीय कार्य राडी तांडा येथे झाले. गावातील नागरिकांनी अतिशय मेहनतीने कार्य केले. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी खड्डे करण्यात आले. या कामात गावातील युवकांचे व्यसनसुद्धा सुटले. या मेहनतीचे फळ गावकऱ्यांना मिळाले. पाणीपातळीत वाढ झालेली दिसून आली. पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत या गावाला राज्यातून तिसरे पारितोषिक मिळाले. यासारखे प्रेरणादायी उदाहरणे आपल्या आजूबाजूलासुद्धा आहेत. कुठलाही गाजावाजा न करता अतिशय शांतपणे, प्रामाणिकपणे ते आपले कार्य करत आहेत. देशाच्या, समाजाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. व्यवस्थेत चुका आहेत म्हणून त्याविषयी तक्रार करत बसण्यापेक्षा सकारात्मक बदल घडण्यासाठी आपल्या क्षमतेप्रमाणे कार्य करत आहेत. साधू-संतांनी सांगितलेच आहे, की ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ या अशा घटकांमुळेच देश घडतो, समाजहित साधले जाते, व्यक्तीनिर्माण होते. असे प्रयत्न करणाऱ्या हातांना बळकटी देण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. फार काही नाही जमले, तरी त्यांचा आदर्श म्हणून स्वीकार तर करू आणि येणाऱ्या पिढीसमोर हा आदर्श म्हणून नक्कीच सांगू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

Diwali Bank Holiday: दिवाळीच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बँकाना तब्बल 3 दिवस सुट्टी! कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? आत्ताच जाणून घ्या

Bogus Sports Certificate Fraud Vaibhav Chavan Beed : सत्याचा लढा जिवावर बेतला! न्याय मागणाऱ्या वैभवच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT