छत्रपती संभाजीनगर

परभणीत दिवाळीच्या उत्साहाला फटाक्यांची रंगत

CD
(आली दिवाळी) फोटोसह परभणी ः शहरात विक्रेत्यांनी थाटलेली फटाक्यांची दुकाने. -------------------- परभणीत दिवाळीच्या उत्साहाला फटाक्यांची रंगत ---------------------------------- -शिवकाशीच्या फटाक्यांसह नवनवीन आकर्षणे बाजारात दाखल -लक्ष्मीपूजनापर्यंत ग्राहकांची गर्दी वाढण्याचा विक्रेत्यांना विश्वास सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ४ ः दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील उड्डाणपूल परिसरातील फटाका मार्केट सज्ज झाले आहे. यंदा या मार्केटमध्ये तब्बल ४२ दुकाने थाटण्यात आली असून, विविध प्रकारच्या फटाक्यांनी बाजारपेठ सजली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणाऱ्या नवनवीन फटाक्यांची रेलचेल असल्याने यंदाच्या दिवाळीत फटाका बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, मनपाच्या अग्निशमन विभागाने निश्चित केलेल्या नियम व सूचनांचे पालन करून विक्रेत्यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर दुकाने सुरू केली आहेत. प्रत्येक विक्रेत्याने साधारण सात ते दहा लाख रुपयांचा फटाक्यांचा साठा उपलब्ध केला आहे. त्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. यंदा शिवकाशी येथून मोठ्या प्रमाणावर फटाके विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. स्काय शॉट, पीकॉक, स्पिनर, हेलिकॉप्टर यांसारखे आकर्षक फटाके लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय सुतळी बॉम्ब, भुईनळे, चक्र, लडी, सेवन शॉट यांसह विविध प्रकारच्या फटाक्यांनी दुकाने सजली आहेत. सध्या ग्राहकांची वर्दळ तुलनेने कमी असली तरी लक्ष्मीपूजनापूर्वी बाजारपेठेत मोठी गर्दी होईल, असा विक्रेत्यांचा विश्वास आहे. ग्रामीण भागातील ग्राहकही खरेदीसाठी शहरात येण्याची अपेक्षा आहे. लक्ष्मीपूजनापासून भाऊबीजेपर्यंतच्या कालावधीत फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यंदा या मार्केटमध्ये तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, यंदा विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्राहकांकडून फटाक्यांना मागणी वाढेल, अशी आशा विक्रेते बालाजी झरकर यांनी व्यक्त केली. --- ((चौकट))) बाजारपेठेस मिळणार चालना दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण असल्याने शेवटच्या काही दिवसांत फटाका मार्केटमध्ये खरेदीची लगबग वाढते. यंदाही परभणी शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांच्या प्रतिसादामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण होईल, स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ---------

Mixed Gender Cricket Tournament : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! मुलं आणि मुली खेळणार एकाच टीममधून; 'हा' नवा विचित्र नियम पाहून चक्रावून जाल!

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Agniveers Extension: अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ! कायम लष्करी सेवेत सामील होण्याची पुन्हा संधी मिळणार

IND vs NZ: 'चेस मास्टर' विराटचा वाढदिवसाआधीच धुमाकूळ! सचिन - पाँटिंगला मागे टाकत रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Mangalwedha Farmers: दिवाळीपूर्वी मंगळवेढ्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना दिलासा; खात्यावर ३४ कोटी ६३ लाख जमा, ८ हजार अजून प्रतीक्षेत!

SCROLL FOR NEXT