छत्रपती संभाजीनगर

भाऊजीची मेव्हुण्याला जबर मारहाण

CD
भांडण सोडवण्यास गेलेल्या मेहुण्यावर चाकूने केले वार परभणी, ता. १४ ः जुना पेडगाव रस्त्यावरील बालाजीनगर येथे बहीण व भाऊजींचे सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मेहुण्यास चाकूने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी भाऊजीवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बालाजीनगर येथील सोमनाथ नागनाथ स्वामी यांनी शुक्रवारी (ता.१३) कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आपली लहाण बहिण मोनिका ही पती कृष्णा स्वामीसोबत बालाजीनगर येथे राहते. भाऊजी कृष्णा यास दारूचे व्यसन असून तो कामधंदा करीत नाही. दारू पिल्यानंतर तो बहीण मोनिकासोबत नेहमी भांडत असतो. नऊ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजता बहिणीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोनिकास पती मारहाण करीत असल्याचे मोबाइलवर कळविले. म्हणून आपली आई लक्ष्मीबाई बहिणीच्या घरी गेल्या परंतु त्या लवकर परत न आल्यामुळे आपणही बहिणीकडे गेलो व भांडण सोडवत असताना कृष्णा याने तु का आला म्हणून शिवीगाळ केली व घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने अचानक कमरेवर, पाठीवर वार करण्यास सुरवात केली. त्यामुळे आपण जखमी झालो, रक्त निघू लागले. तेव्हा आपण मामेभाऊ अजय स्वामी यास फोन लावून बोलावले व त्याने आपणास सरकारी दवाखान्यात दाखल केले. यावेळी ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून कृष्णा स्वामी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Latest Marathi News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग.. प्रवासी भाविक सुखरूप

Air Pollution: प्रदूषणाचा विळखा जीवघेणा! आरोग्य विम्याच्या क्लेममध्ये 3 वर्षांत 4.3 पट वाढ; पुणे देशात दुसरे

SCROLL FOR NEXT