परभणीत आगीच्या चार घटना
------------------------------
- घरांचे नुकसान; सुदैवाने अनर्थ टळला
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ९ : दिवाळीच्या उत्साहादरम्यान शहरात रविवारी (ता.आठ) रात्री आगीच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. या घटनांत दुकाने आणि घरांचे नुकसान झाले. सुदैवाने या चारही घटनांमध्ये कुणालाही इजा झाली नाही. आगीच्या घटनांमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण होते.
शहरातील बालाजीनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरास आग लागली. शंकर देशमुख यांनी आगीची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी पोचेपर्यंत घरातील दुकान आणि मागच्या दोन खोल्या जळाल्या. या घटनेत सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महावितरणचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. दुसरी घटना बसस्थानकाजवळील नाल्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या दुकानात घडली. दुकानावरील कडब्याने अचानक पेट घेतल्याने आग लागली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत दुकानासह घरांचे मोठे नुकसान झाले. तिसरी घटना श्रीमूर्तीनगर परिसरातील साईमंदिराजवळ घडली. मध्यरात्रीच्या सुमारास साईमंदिराजवळील परिसरात आग लागली. त्याचप्रमाणे चौथी घटना सावली रेस्टॉरंटच्या पाठीमागेही आग लागल्याची घटना घडली. शहरातील गव्हाणे चौक परिसरात झरकर यांच्या घरासमोरही आग लागल्याने अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.