छत्रपती संभाजीनगर

शहरातील शाहू फिडरच्या वारंवार ट्रिपिंगमुळे नागरिक त्रस्त

CD
परभणीत शाहू फिडरवर वारंवार ट्रिपिंग ------ नागरिक त्रस्त; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी ---- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २८ ः शहरातील जिंतूर रस्त्यावरील ११ केव्ही शाहू फिडरवर वारंवार ट्रिपिंग होत असल्याने शहरी भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. या फिडरवर महिन्यातून तब्बल ४० ते ५० वेळा ट्रिपिंग होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाहू फिडरवर शाखा क्रमांक ३, शाखा क्रमांक ४, ग्रामीण उपविभागातील आर-१ आणि आर-२ या भागांशी संबंधित वीजजोडण्यांचा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरी भागासाठी असलेल्या फिडरवर ग्रामीण भागातील वीजजोडण्या जोडल्या जात असल्याचा आरोप असून, त्यामुळे फिडरवरील भार वाढून वारंवार ट्रिपिंग, लाइन फॉल्ट होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, पाथरी रोड आणि जिंतूर रोड परिसरातील काही ग्रामीण वीजजोडण्या शहरी फिडरला जोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या जोडण्या कोणत्या तांत्रिक निकषांनुसार करण्यात आल्या, त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली होती का आणि या व्यवस्थेमुळे शहरी वीजपुरवठ्यावर नेमका किती परिणाम होत आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात काही कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताबाबतही आरोप केले जात आहेत. तसेच काही राजकीय व्यक्ती आणि व्यावसायिकांच्या हितसंबंधांमुळे ग्रामीण भागातील वीजजोडण्या शहरी फिडरवर जोडल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या फिडरच्या कार्यक्षेत्रात एका राज्यमंत्र्यांचे निवासस्थान असल्याचे सांगितले जात असूनही वीजपुरवठ्याच्या समस्येकडे संबंधित यंत्रणेचे पुरेसे लक्ष नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. ---- ((चौकट)) तांत्रिक तपासणीची आवश्यकता वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे घरगुती ग्राहकांसह दुकानदार, लघू उद्योजक आणि व्यावसायिकांचे कामकाज प्रभावित होत आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ११ केव्ही शाहू फिडरची तांत्रिक तपासणी करावी, वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगची कारणे शोधावीत आणि नियमबाह्य जोडण्या आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. --- प्रशासनाने लक्ष देण्याची गरज शहरी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचे नियोजन तांत्रिक नियमांनुसार होणे आवश्यक आहे. शाहू फिडरवरील वारंवार होणाऱ्या बिघाडांमागील नेमके कारण स्पष्ट करून दोषपूर्ण यंत्रणा दुरुस्त करावी आणि नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून नागरिकांना दिलासा देणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

Supreme Court Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी! 'कोर्ट मास्टर' पदासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

SCROLL FOR NEXT