hospital  sakal
छत्रपती संभाजीनगर

Parbhani : मानवतच्या उपजिल्हा रुग्णालयास ४८ कोटी

होणार ५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, रुग्णांची गैरसोय टळणार

राजेश नागरे

मानवत : शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यासाठी १९ ऑगस्ट २०१९ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली होती. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन ची फाईल लाल फितीत अडकली होती. सत्तांतर होतात माजी आमदार मोहन फड यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे सोमवारी (ता. १०) या रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामासाठी ४८ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळवली आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालय बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मानवत शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून १०० खाटांवर श्रेणीवर्धन करण्यासंदर्भातील प्रस्ताव १० जुलै २०१८ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला होता. ता. १९ ऑगस्ट २०१९ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली होती. उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने शहरासह ग्रामीण भागात रुग्णांना याचा लाभ होणार आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर या ठिकाणी सर्व प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन कक्ष, अतिदक्षता विभाग, सर्पदंश, विषबाधा झालेल्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर करण्याची आवश्यकता पडणार नाही. गर्भवती स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेली सिझेरीयन प्रसूतीचीही या ठिकाणी सोय असणार आहे. माता बालसंगोपन कक्ष, पुरुष कक्ष, स्त्रीकक्ष, संसर्गजन्य कक्ष, विशेष अतिदक्षता विभाग व अपघात विभाग असे पाच स्वतंत्र कक्ष सुरु करता येणार आहेत. यामुळे रुग्णांना शहरातच अत्यावश्यक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

परभणीच्या चकरा वाचणार

हे रुग्णालय झाल्यानंतर परिसरातील रुग्णांच्या जिल्हाठिकाणी जाण्या-येण्याच्या खर्च आणि चकरा वाचणार आहे. त्यामुळे आगामी काळात आर्थिक बचतीसह वेळही वाचणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या रुग्णालयाच्या श्रेणी वर्धन प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले होते व सत्तेत नसल्या कारणाने माजी आमदार मोहन फड हेदेखील काही करू शकत नव्हते. परंतु, गेल्या काही काळात माजी आमदार फड आणि युवा नेते डॉ. अंकुश लाड या दोघांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT