छत्रपती संभाजीनगर

वैद्यकीय महाविद्यालयाला इमारतीची प्रतीक्षा

CD
वैद्यकीय महाविद्यालयास इमारतीची प्रतीक्षा - ४०३ कोटींचा प्रकल्प कागदावरच - परभणीमध्ये रखडले बांधकाम - तीन वर्षांत चार अधिष्ठाता तरी प्रश्न कायम सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १८ ः जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरी महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीचे मुख्य बांधकाम अद्याप अपेक्षित गतीने सुरू झालेले नाही. ब्रह्मपुरी परिसरातील ५० एकर जागेवर महाविद्यालय, संलग्न रुग्णालय, विद्यार्थ्यांची वसतिगृहे आणि निवासी इमारती उभारण्यासाठी तब्बल ४०३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. जागा आणि निधी उपलब्ध असतानाही प्रशासकीय अडथळ्यांमुळे प्रकल्पाचे काम रखडले असून सध्या संरक्षक भिंतीपलीकडे मुख्य इमारतीच्या बांधकामाची प्रतीक्षाच कायम आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ब्रह्मपुरी परिसरात ५० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक विभाग, संलग्न रुग्णालय, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे तसेच निवासी इमारती उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शासनाकडून ४०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, औद्योगिक आरक्षणासह विविध प्रशासकीय प्रक्रियांमुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला अपेक्षित वेग मिळू शकलेला नाही. प्रकल्पस्थळी संरक्षण भिंतीचे काम झाले असले, तरी त्यानंतर मुख्य इमारतीच्या बांधकामाला ठोस गती मिळालेली दिसत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा मंजूर निधी आणि उपलब्ध जागा असूनही प्रत्यक्षात उभारणीचे काम संथ असल्याने प्रकल्पाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासकीय पातळीवरील उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कंत्राटदाराकडून मुख्य बांधकामाला गती देण्याची गरज आहे. अन्यथा मंजूर निधीचा लाभ प्रत्यक्ष सुविधांमध्ये रूपांतरित होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयाने तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला. या काळात महाविद्यालयाला चार अधिष्ठाता मिळाले. मात्र, स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अद्याप कायम आहे. आता नव्याने अधिष्ठाता म्हणून पवार यांनी शुक्रवारी सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांच्या कार्यकाळात तरी रखडलेल्या बांधकामाला गती मिळते का, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. --- विद्यार्थी अजूनही ‘भाडेकरू’ स्वतंत्र कॅम्पस उपलब्ध नसल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण अद्याप भाड्याच्या जागेत सुरू आहे. स्वतंत्र कॅम्पसमध्ये शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, वसतिगृहांसह आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम लांबत असल्याने विद्यार्थ्यांना या सुविधांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. ((चौकट))) जागा निश्चित, निधीही मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी जागा निश्चित, आराखडा आणि ४०३ कोटींचा निधी मंजूर असताना प्रत्यक्ष बांधकामाला गती का मिळत नाही, हा मुख्य प्रश्न आहे. शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असला तरी स्थानिक पातळीवरील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन मुख्य बांधकाम प्रत्यक्षात सुरू होणे गरजेचे आहे. अन्यथा मंजुरी आणि निधीचे आकडे कागदावरच राहण्याची आणि विद्यार्थ्यांची स्वतंत्र कॅम्पसची प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT