छत्रपती संभाजीनगर

परभणी जिल्ह्यात सावकारांचा विळखा कायम

CD
जिल्ह्यात सावकारांचा विळखा कायम -------------- -परभणी तालुक्यातच ८५ सावकार; सेलू तालुक्यात एकही नाही नोंदणीकृत सकाळ वृत्तसेवा परभणी, ता.३ ः बँका, पतसंस्था, शासनाच्या विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे पर्याय उपलब्ध असतानाही परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कायम असल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून समोर आले आहे. परभणी तालुक्यातील सावकारांनी वर्षभरात व्यापाऱ्यांना ८ लाख ४२ हजार रुपये, तर इतर कर्जदारांना २ लाख ६ हजार रुपये वितरित केले. तालुक्यातील एकूण कर्जवाटप १० लाख ४८ हजार रुपये इतके आहे. सावकारांची संख्या आणि त्यांनी केलेले कर्जवाटप या दोन्ही बाबींमध्ये परभणी तालुका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. परभणीपाठोपाठ जिल्ह्यातील विविध तालुक्यांत परवानाधारक सावकारांकडून कर्जवाटप करण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यात १० सावकारांनी २ लाख ८४ हजार रुपये, तर मानवत तालुक्यातील पाच सावकारांनी २ लाख ४७ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. सोनपेठमधील तीन सावकारांनी १ लाख ४३ हजार रुपये, गंगाखेडमधील सात सावकारांनी १ लाख ५१ हजार रुपये, पालममधील चार सावकारांनी १ लाख २५ हजार रुपये, तर पूर्णा तालुक्यातील सात सावकारांनी ८७ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात परवानाधारक सावकारांची नोंद असली, तरी सेलू तालुका या चित्राला अपवाद ठरला आहे. सेलू येथे एकही परवानाधारक सावकार नोंदणीकृत नसल्याने व्यापारी तसेच इतर कर्जदारांना अशा सावकारांकडून झालेल्या कर्जवाटपाची नोंदही शून्य आहे. परभणी तालुक्यात ८५ सावकारांची उपस्थिती असताना सेलू तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नसल्याचे विरोधाभासी चित्र आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सावकारी व्यवसायाचे केंद्रीकरण काही तालुक्यांमध्ये अधिक असल्याचे दिसून येते. ------------ ((चौकट))) ३० लाखांवर कर्ज वितरित जिल्ह्यात नोंद असलेल्या १२५ परवानाधारक सावकारांनी वर्षभरात व्यापारी आणि इतर घटकांना एकूण ३० लाख ११ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या कर्जवाटपात व्यापाऱ्यांना १८ लाख २३ हजार रुपये, तर इतर कर्जदारांना ११ लाख ८८ हजार रुपये देण्यात आले आहेत. सावकारांच्या संख्येचा विचार करता परभणी तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील एकूण १२५ सावकारांपैकी ८५ सावकार एकट्या परभणी तालुक्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६८ टक्के परवानाधारक सावकार एकाच तालुक्यात असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

SBI ATM Rule: 1 ऑक्टोबरपासून ATMच्या नियमांत मोठा बदल! नियम समजून घ्या, नाहीतर भरावा लागेल चार्ज

Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग, निकृष्ट कामावर उपमहापौरांचा दणका; सॅम्पल तपासणीचे निर्देश, बिल न काढण्याची सूचना

Mumbai-Goa Highway : पुढील 6 महिन्यांत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार! गणेशोत्सवाआधी 'हा' महत्त्वाचा पूल प्रवाशांच्या सेवेत; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT