छत्रपती संभाजीनगर

पाथरी विधानसभा मतदारसंघात दुष्काळ आढावा बैठकांचे आयोजन

CD
पाथरी, मानवत, परभणी तालुक्यात उद्यापासून दुष्काळ आढावा बैठका ------------- आमदार राजेश विटेकर यांची माहिती सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १६ : पाथरी विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी बुधवारपासून (ता.१८) तालुकास्तरीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकांत दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावनिहाय केलेल्या उपाययोजना, महसूल मंडळनिहाय विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. पाथरी, मानवत, परभणी तालुक्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट गावांतील सद्यस्थिती, पाणीटंचाई, शेतीविषयक समस्या, दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. प्रशासनाने यापूर्वीच दुष्काळ निवारणाचे आराखडे तयार केले आहेत. मात्र, संबंधित भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच यांच्या सूचनांनुसार गावपातळीवरील अडचणी जाणून घेऊन अतिरिक्त कोणती कामे हाती घेणे आवश्यक आहे. याबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार आहे. या बैठकांना पाथरी व परभणी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जयकवाडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जलसंधारण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, सहायक निबंधक, पशुवैद्यकीय अधिकारी, महावितरणचे उपअभियंता आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुष्काळाशी संबंधित समस्या आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच यांनी सविस्तर लेखी निवेदने घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार विटेकर यांनी केले आहे. सोनपेठ तालुक्यातील दुष्काळ आढावा बैठक या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. …. बैठकांचे वेळापत्रक असे परभणी येथे बुधवारी (ता. १८) दुपारी १ वाजता बी. रघुनाथ सभागृहात बैठक होईल. गुरुवारी (ता.१९) सकाळी १० वाजता अंजली मंगल कार्यालय पाथरी येथे, तर दुपारी २ वाजता रेणुका मंगल कार्यालय मानवत येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Scam: आयोगाचे दोन सदस्य चौकशी समितीच्या रडार वर? तुकाराम मुंढे काय कारवाई करणार?

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

राज ठाकरेंची मोठी खेळी! बड्या नेत्यांसह ३५० कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश, एकनाथ शिंदेंसह छावा संघटनेला धक्का

Kulgam Encounter: कुलगाम हल्ल्याचा बदला! लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी ठार; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांची मोठी कारवाई

Latest Marathi News Update : सोलापुरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाही

SCROLL FOR NEXT