छत्रपती संभाजीनगर

पे ॲण्ड पार्कला व्यापारी महासंघाचा विरोध

CD
व्यापारी महासंघाचा ‘पे ॲण्ड पार्क’ला विरोध -- - खासगी संस्थेमार्फत वसुलीला आक्षेप - मनमानी आणि दादागिरीची भीती - निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी - व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्या -- छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : शहरातील काही बाजारपेठांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘पे ॲण्ड पार्क’ योजना राबविण्यासाठी महापालिकेने खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. मात्र, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि नगरसेवकांना विश्वासात न घेता पार्किंग शुल्क वसुलीचा निर्णय घेतल्याने जिल्हा व्यापारी महासंघाने त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयामुळे मनमानी वसुली आणि नागरिकांना दादागिरीचा सामना करावा लागण्याची भीती महासंघाने व्यक्त केली आहे. शहरातील पार्किंगला शिस्त लागणे आवश्यक असून, त्याला व्यापाऱ्यांचा विरोध नाही. मात्र, कोणतीही चर्चा न करता आणि हरकतींची दखल न घेता जुनेच कंत्राट पुढे रेटणे योग्य नाही, अशी भूमिका महासंघाने मांडली. यापूर्वी ६ ऑगस्ट २०२५ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. त्यात ग्राहकांना सुरुवातीची दहा मिनिटे पार्किंग शुल्कातून सूट देणे, तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील त्यांच्या खासगी वाहनांवर शुल्क आकारू नये, अशा सूचना मांडण्यात आल्या होत्या. मात्र, सध्याच्या प्रक्रियेत या सूचनांचा विचार झाल्याचे दिसत नाही. कंत्राट पूर्वीच्या प्रशासनाने दिल्याचे सांगून सध्याचे पदाधिकारी आणि अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून महिला, नागरिक आणि व्यापाऱ्यांकडे दादागिरीने वसुली होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करून ‘पे अँड पार्क’च्या कामाला तातडीने स्थगिती द्यावी. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाने केल्याचे उपाध्यक्ष लक्ष्‍मीनारायण राठी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT